Uddhav Thackeray slam PM Modi CM Eknath Shinde Shrikant Shinde over dynasty politics in kalyan dombivli Visit  
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : कल्याण लोकसभा म्हणजे बापकी जायदाद? गद्दारांची घराणेशाही म्हणत उद्धव ठाकरेंनी फटकारले

उद्धव ठाकरे हे आज कल्याण डोंबिवली मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.

रोहित कणसे

उद्धव ठाकरे हे आज कल्याण डोंबिवली मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच ठाकरेंनी नाव न घेता कल्याण डोंबिवलीचे विद्यामान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आज फक्त शाखा भेटीला आलोय जाहीर सभेला नाही, हा मतदार संघ वेगळा आहे हा भगव्याला बालेकिल्ला आहे ज्या नी गद्दारी केली त्यांना गडण्याचा शहर आहे असं मत व्यक्त केलं.

२२ जानेवारी रोजी होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याप्रमाणे सोमनाथ मंदीर ज्याचा विध्वंस झाला होत त्याचं पुनरबांधणी सरदार वल्लभाई पटेल यांनी केली. जेव्हा या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सुरू होती तेव्हा पटेलांचं निधन झालं होतं.त्यावेळच्या लोकांनी प्राणप्रतिष्ठेसाठी देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना बोलवलं होतं. कारण ती देशाच्या अस्मितेची प्राणप्रतिष्ठा होती. याही वेळेला राष्ट्रपतींना बोलवावं ही आमची जाहीर मागणी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करताना बाजूला सीता माईपण असणार, पण निदान प्राणप्रतिष्ठा करताना तरी रामाचा फोटो येईल आणि मध्ये रामाची मूर्ती तरी असेल याची मी अपेक्षा करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

म्हणून ठाकरेंची घराणेशाही नको झाली...

काल पंतप्रधान घराणेशाहीवर देखील बोलले. आज मी नेमकं अशा मतदारसंघात आलोय जिथं आपल्याला गद्दारांची घराणेशाही गाडायची आहे. मी पंतप्रधानांना सांगतो की, उगाच घराणेशाहीवर बोलू नका, तुम्ही आमच्या घराण्यावरती बोललात तर आम्ही देखील तुमच्या घराण्यावर बोलू. निदान जो घरंदाज आहे त्याने घराणेशाहीवर बोलावं, जो घरंदाजच नाही तो घराणेशाहीवर काय बोलणार? त्यांना घराण्याची परंपरा काय असते याची कल्पना नाही. म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली ठाकरेंची घराणेशाही नको झाली आणि गद्दारांची घराणेशाही आपली वाटायला लागली असे उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दारांची घराणेशाही गाडून टाकण्यासाठी तुम्ही किती तयार आहात हे पाहण्यासाठी मी आलोय असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

माझी चूक झाली...

कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपने बापकी जायदाद है असं त्यांना वाटलं होतं, कारण तेव्हाही निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराणेशाहीला मी उमेदवारी दिली होती. चूक माझी आहे. पण मी केलेली चूक तुम्ही सुधरायची आहे. यावेळी मी पण ती सुधारणार आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT