uddhav thackeray Criticizes PM Narendra Modi 
महाराष्ट्र बातम्या

अमित शहांची इडी, ममतांचं कौतुक, सेनेचा पंतप्रधान; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना संबोधित करत आहेत. आज बाळासाहेब ठाकरेंची ९६वी जयंती आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि त्यांच्या हिंदूत्वावर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, कोरोनाच्या लाटामागून लाटा येत आहेत, तर शिवसेनेची लाट का आणू शकत नाही? एक व्हायरस लाटा आणू शकतो तर भगव्याचा वारसा असणारा पक्ष आपली लाट का आणू शकत नाही? असा सवाल करत त्यांनी दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न आपण पूर्ण करायचं आहे, असं म्हटलं आहे. तसेच बाबरीनंतर सेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज पंतप्रधान आपला असता, असंही त्यांनी म्हटलंय.

लवकरच मी महाराष्ट्र पिंजून काढणार

पुढे ते म्हणाले की, आज मी तुमच्यासमोर खूप दिवसांनी आलो. मधले एक-दोन महिने माझे उपचारामध्ये गेले. लवकरात लवकर मी बाहेर पडून महाराष्ट्र पिंजून काढणार. जे माझ्या विरोधात तब्येतीची काळजी घेत आहेत, त्या विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार आहे. हे काळजीवाहू विरोधक कधीतरी आपले विरोधक होते, ज्यांना आपण पोसलं, मागेही मी म्हटलो की २५ वर्षे आपली युतीमध्ये सडली. ते मत ठाम आहे. हिंदूत्वासाठी आपल्याला सत्ता हवी होती. आजचं यांचं हिंदूत्व हे सत्तेसाठीचं आहे. त्यांनी हिंदूत्वाचं कातडं पांघरलं. अनेकदा आपल्यावर टीका होते. आम्ही हिंदुत्व नाही सोडलं, त्यापासून दूर जाऊ शकत नाही. भाजपला सोडलं, हिंदूत्व नाही. भाजप म्हणजे हिंदूत्व नाही, असंही ते म्हणाले आहेत.

अमित शहांवर टीका

पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शहा आपल्यावर टीका करुन म्हणाले, एकट्याने लढा. आम्ही आव्हान स्विकारलं आहे. आव्हान द्यायचं आणि मागे इडीची पीडा लावायची हे शौर्य नाही. ते दिवस आठवा ज्यावेळी यांचं डिपॉझिट जप्त व्हायचं. त्यावेळी यांनी प्रादेशिक पक्षाशी युती करुन सरकार चालवलं. आता तोच भगवा पुसट होत चालला आहे. हे नवहिंदुत्ववादी हिंदुत्वाचा वापर स्वताच्या स्वार्थासाठी करत आहेत. सोयीप्रमाणे बदलणारे हिंदुत्व आमचं नाही. सत्ता पाहिजे मम्हणून हिंदुत्वाद्यांशी युती, संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमारशी युती, मेहबुबा मुफ्तीशी युती, असं करणारे हे नवहिंदुत्वावादी आहेत. हिंदुत्व असं असू शकत नाही. खरे हिंदुत्ववादी असेल तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक धोरण करुन चला, असंही त्यांनी म्हटलंय.

उजेडात शपथ घेतली, अंधारात नाही

मुख्यमंत्री म्हणाले की, आम्हाला तुम्ही गुलामासारखं वागवू इच्छित होता. आम्ही सूर्य उगवल्यावर शपथ घेतली अंधारात नाही. चोरून मारु नाही. आम्ही करतो ते उघडपणाने करतो. तुम्ही दिलेलं वचन मोडंल म्हणून आम्ही घऱोबा केला. अनेक ठिकाणी सरकार पाडून घरे तोडून सरकार स्थापन केल आणि लोकशाहीच्या गप्पा मारल्या. हे हिंदुत्व नाही, असं त्यांनी म्हटलं. नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या. इतर राज्यातही लढवत आहोत आपण. खरं हिंदूत्व काय आहे, ते घेऊन जायचं. विजायचा उन्माद नाही पराभवाचं दुख नाही. एक दिवस आपला जरुर येऊ, आपण तो आणूच. एक गोष्ट खरीये की, आपण सर्व जागा लढवल्या नव्हत्या. शिवसेनेचं असं का होतं, अशा चर्चा करण्यात आल्या. जे निवडून आलेत, त्याचा आढावा घेतला तर, आजपर्यंत जेवढ्या जागा लढवल्या त्याच्यात यावेळेला जास्त आलेले आहेत. पण यावर मी समाधानी नाही. आपण खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी... लोकसभा विधानसभेप्रमाणेच आपण हे जिद्दीने लढवल्या पाहिजेत. इतर पक्षासारखंच आपण तयारी केली पाहिजे. आपण संस्थात्मक काम का करत नाही. तसं आपण केलं पाहिजे, असं त्यांनी शिवसैनिकांना सल्ला दिला आहे.

तर सेनेचा पंतप्रधान असता

यावेळी उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जींचं कौतुकही केलं आहे. बंगालची वाघीण यांना एकट्याने नडली असंही ते म्हणाले. तसेच बाबरीच्या पतनानंतर जर सेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज पंतप्रधान आपला असता, असंही त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT