Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्षपद सोडणार? निवडणूक आयोगाने...

Komal Jadhav (कोमल जाधव)

उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख पदाची मुदत उद्या म्हणजेच २३ जानेवारीला संपतेय. त्यामुळे आता उद्धव ठाकरे खरंच शिवसेना पक्षप्रमुखपद सोडणार का? असा प्रश्नही उपस्थित होतोय. त्यातच शिवसेना पक्ष कोणाचा असा वाद निवडणूक आयोगात आणि न्यायालयात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्षपदाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. (Uddhav Thackeray news in Marathi)

२३ जानेवारी, २०२३ ही तारीख शिवसेना पक्षासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख पदाची मुदत याच २३ जानेवारी, २०२३ ला संपतेय. विशेष म्हणजे उद्याच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची जयंतीही आहे. आणि याच तारखेला उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख म्हणून आणि राष्ट्रीय कार्यकारणीचीही मुदत संपतेय. त्यामुळे नेता निवडीसाठी प्रतिनिधी सभा घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून अर्जाद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. पण त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगानं काहीही स्पष्ट केलेलं नाही.

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिवशी आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेणार असल्याचं कळतंय. केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात कुठलाही निर्णय न झाल्यानं ठाकरे गटानं हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

तिकडे केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटानं आपापली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात ठाकरे गटाकडून पक्षात फूट पडलेली नाही. एकनाथ शिंदे भाजपाच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप करण्यात आला. तर, शिंदे गटानं उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुखपदच बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयातून बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयी निर्णय येत नाही तोपर्यंत शिवसेनेतल्या पक्षप्रमुख पदाचा, पक्ष नेमका कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

त्यातच उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुखपदाचा कार्यकाल उद्या संपतोय. त्यामुळेच आता शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी कोण बसणार? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे हा प्रश्न विचारला जात आहे. निवडणूक आयोगानं २० जानेवारीच्या सुनावणीत निकाल दिला असता तर हा पेचच निर्माण झाला नसता. पण, आता निवडणूक आयोगानं ३० जानेवारीची सुनावणीची तारीख दिल्यामुळे कायदेशीररित्या शिवसेना पक्षप्रमुखपदी कोण राहणार? या प्रश्नावर ठाकरे-शिंदे गटात तसेच राजकीय वर्तुळातही अनेक तर्कवितर्क लावले जाताहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal passport case : निलेश घायवळला पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या एजंटची चौकशी होणार; सध्या कारागृहात भोगतोय शिक्षा

इरफान खान यांच्या गाजलेल्या 'द लंचबॉक्स' या सिनेमाचा येणार सिक्वेल ? सोशल मीडियावर होतेय चर्चा

Latest Marathi News Live Update: मुंबईच्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या परिसरात मनसे कडून दीपोत्सवाचे आयोजन

Nashik News : कडीकोयंड्यासाठी सहा महिने! दिंडोरीची १०८ रुग्णवाहिका गॅरेजमध्ये; रुग्ण गंभीर असताना वेळेत मदत नाही

Online Food Delivery: ऑनलाइन अन्नसेवा ठप्प! स्वीगी कर्मचाऱ्यांचा कंपनीविरोधात संप; प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT