Uddhav Thacekray-Mamata Banerjee google
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरेंनी ममतांना भेट नाकारली, आदित्य ठाकरेंसोबत घेणार बैठक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) या तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर (Mamata Banerjee Maharashtra Visit) आहेत. यावेळी त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Maharashtra CM Uddhav Thackeray) भेट घेणार होत्या. मात्र, मुख्यमंत्री आजारपणामुळे विश्रांती घेत आहेत. त्यामुळे ते ममता यांना भेटणार नाही, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर सध्या ते विश्रांती घेत आहेत. त्यामुळेच ममतांच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री त्यांना भेटणार नाही, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. तसेच मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत आज रात्री आठ वाजता ममता बैठक घेणार आहेत. तसेच संजय राऊत देखील या बैठकीला उपस्थित राहतील, अशी माहिती स्वतः राऊत यांनी दिली आहे.

बंगालमध्ये गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ममतांचा दौरा असून ममता बॅनर्जी उद्या १ डिसेंबरला मुंबईतील उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटसाठी आमंत्रणसुद्धा देणार आहेत. यावेळी ममता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील भेटणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

३३ लाख वारकऱ्यांच्या गर्दीत एकही चोरी नाही! पोलिस अधीक्षक म्हणाले, आषाढी वारीइतकी गर्दी कधीच बघितली नाही, ‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही खूप टेन्शन होते’, पण...

‘एमआयडीसी‘तील बंद टॉवेल कारखान्यात वेश्याव्यवसाय! वॉचमन महिलेचा कारनामा, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील घटना, 2 पीडितांची सुटका; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

Mor Kali Recipe: नाश्त्यासाठी काहीतरी लाईट हवंय? बनवा दाक्षिणात्य पद्धतीची चविष्ट 'मोर कली'!

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

SCROLL FOR NEXT