Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Uddhav Thackeray will not resign; The state cabinet meeting ended -nad86
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे राजीनामा देणार नाहीत; राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेसोबत महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. अल्पमतात सरकार आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मंत्रिमंडळ बैठकीत राजीनामा देतील असा तर्क लावला जात होता. मात्र, ते राजीनाम्याचा निर्णय घेणार नसल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मिळाली आहे. (Uddhav Thackeray will not resign; The state cabinet meeting ended)

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर महाविकास आघाडीतर्फे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाबाबत चर्चाच झाली नसल्याची माहिती आहे. नियमित विषयावर चर्चा करीत बैठक संपल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे किंवा आमदारांनी केलेल्या बंडखोरीवर कोणतीही चर्चा केली नसल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळासमोर असलेल्या नियमित अकरा विषयावर निर्णय घेऊन ही बैठक संपली.

राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा सध्या विचार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांना सांगितल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. काँग्रेसचे (Congress) नेते कमलनाथ यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर ही माहिती समोर आली. आता सरकारचे कामकाज सुरू असून लगेच राजीनाम्याचा निर्णय घेणार नसल्याचे संकेत मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर; वाचा नव्या अभ्यासात काय काय आढळले

IPL Playoffs : IPL प्लेऑफ समीकरण, 2 जागीसाठी 5 संघ भिडणार, जाणून घ्या कोणाचा रस्ता आहे सोपा?

Video: सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांचं कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

Hansal Mehta: हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...

फक्त 2 पानांचा बायोडाटा, अन् थेट Google, Microsoft मध्ये मिळाली नोकरीची संधी, भारतीय वंशाच्या तरुणीची कमाल!

SCROLL FOR NEXT