Uddhav Thackrey  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: "शिवसेनेच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचं नाव गद्दार म्हणून लिहिले जाईल"

स्वत:च्या पक्षाचे आमदार संपविण्याचे कामही उद्धव ठाकरे यांनी केले

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा उद्धव व आदित्य ठाकरे यांची नावे गद्दार म्हणून लिहिली जातील, अशी जहरी टीका शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी काल (मंगळवारी) पंढरपुरात केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी ५७ टक्के निधी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांना दिला. स्वतःच्या पक्षाचे आमदार संपविण्याचे काम देखील याच उद्धव ठाकरे यांनी केले. पक्षप्रमुखांच्या त्रासाला व चुकीच्या कारभाराला कंटाळून शेवटी चाळीस आमदार बाहेर पडले, असा गौप्यस्फोटही कदम यांनी केला आहे.

रामदास कदम आज सहकुटुंब श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी श्री. कदम म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले.

स्वतःला मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्रिपद मिळावे यासाठी त्यांनी भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत युती केली. त्यांची नीती एकाही आमदाराला मान्य नव्हती. त्यातूनच चाळीस आमदारांनी उठाव केला. स्वतःमध्ये राज्यात फिरून सभा घेण्याची हिंमत नाही. खेडमध्ये अफजल खानासारखे चाल करून आले. सभा घेतली. सभेला कोकणातील जनतेने पाठ फिरवली. त्याच खेडमध्ये दीड लाख लोकांची जाहीर सभा घेतली. म्हणून आता इतर दोन पक्षांना सोबत घेऊन सभा घेण्याची दुर्दैवी वेळ आली. यावेळी शिवसेनेचे महेश साठे, चरण चवरे, तालुकाप्रमुख शिवाजी बाबर आदी उपस्थित होते.

उद्धव यांना वाघ नव्हे शेळ्या-मेंढ्या पाहिजेत

उद्धव ठाकरे यांना वाघ नको आहेत, त्यांना शेळ्या-मेंढ्या पाहिजेत, असा टोलाही रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून लगावला. पर्यावरणमंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी माझ्याकडे दोन वर्षे येऊन काका-काका म्हणत माझ्या खात्याची माहिती समजून घेतली आणि मलाच त्यातून बाहेर काढून स्वतः त्या मंत्रिपदावर बसले, असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT