Uddhav Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: बाबरी वादावर चंद्रकांत पाटलांना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, अंगलट येऊ...

बाबरीच्या आठवणीतील खंदकातील अनेक उंदीर आता बाहेर पडायला लागले अशी टीका

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या आठवणीतून बाहेर पडले. बाबरीच्या आठवणीतील खंदकातील अनेक उंदीर आता बाहेर पडायला लागले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, "बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात लपले होते. एकही बाहेर यायला तयार नव्हता. अगदी त्यावेळी आपले माननीय पंतप्रधान बांगलादेशाच्या युद्धात म्हणजे त्या सत्याग्रहात सहभागी होते. पण बाबरीच्या आंदोलनात ते कदाचित हिमालयात असतील पण त्यांचं नाव कुठेही आलं नव्हतं"

तेव्हाचे भाजपचे म्हणजेच भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी आपल्या अंगलट काहीही येऊ नये म्हणून जाहीर केलं होतं की, बाबरी पाडण्यात भाजप वैगरी कोणी नव्हतं, हे काम कोणी केलं असेल तर ते शिवसेनेनंच केलं असेल. ही बातमी जेव्हा आली तेव्हा मी हजर होतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

बाबरी पाडल्याचं सांगायला मी बाळासाहेबांकडे गेले तेव्हा संजय राऊतांशी ते बोलत होते आणि म्हणाले की, "जर बाबरी शिवसेनैनिकानं पाडली असेल तर मला अभिमान आहे. त्यानंतर ते चिडले आणि म्हणाले कसलं हे नपुंसक हिंदुत्व आहे. एखाद्या कार्यकर्त्याला आपण सांगायचं आणि घटना घडल्यानंतर पळून जायचं असं नेतृत्व असेल तर या देशात हिंदू कधी उभं राहू शकणार नाही"

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी आपण त्यावेळी व्यवस्थापन संदर्भातील कामासाठी अयोध्येमध्ये उपस्थित होतो असंही सांगितलं होतं.

बाबरी मशीद प्रकरणासंदर्भात झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते बोलताना म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी जबाबदारी स्वीकारली पण तिथे अयोध्येमध्ये शिवसेना गेली होती का? बाळासाहेब गेले होते का? असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

"त्यावेळेचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती का बजरंग दिलं तिथे होतं? कारसेवक कोण होते? काही एवढं जनरलाइज करण्याचं कारण नाही. कारसेवक हिंदू होते. कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वहिनींच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असे नव्हते की हम बजरंग दल का नाम नही लेंगे. हम ना शिवसेना के नाही, बजरंग दल के नही असं त्यांचं नव्हतं. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं. की ये कर सकते है आणि त्यांनी केलं ते," असं चंद्रकांत पाटील मुलाखतीवेळी बोलताना म्हणाले आहेत.

तर पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, "बाबरी ज्यांनी पाडली ते शिवसैनिक नव्हते. मला महिनाभर नेऊन ठेवलं होतं. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, हरेंद्र कुमार आम्ही 3 राष्ट्रीय सरचिटणीसांना तिथं कॉम्बिनेशनमध्ये ठेवलं होतं. संध्याकाळच्या सभा होणं, संताची व्यवस्था वगैरे ठेवली होती. काहीही होवो, ढाचा पडो न पडो पण सगळ्यात शेवटी तुम्ही तिघांनी बाहेर पडायचं असं सांगितलं होतं असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, एका विवाहितेच्या आत्महत्येशी संबंध? शवविच्छेदन अहवाल बदलण्याचं रॅकेट?

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिवसेना नेत्याची सून होणार, साखरपुड्यातील व्हिडिओ व्हायरल, होणारा नवरा काय करतो?

UPI Mapper ने घातलाय धुमाकूळ! UPI अ‍ॅप्सच्या हुशारीमुळे युजर्स गोंधळात; NPCI ने घेतला मोठा निर्णय, ऑनलाइन पेमेंट करत असाल तर हे एकदा बघाच

रोहित शर्मा, विराट कोहली आता पुन्हा केव्हा निळ्या जर्सीत दिसणार? २०२७च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

BJP Leader Crime : भाजप नेत्याची गुंडागर्दी! शेतकऱ्याला कारखाली चिरडून मारले, वडिलांना वाचवायला आलेल्या मुलींचेही फाडले कपडे

SCROLL FOR NEXT