Eknath Shinde - Uddhav Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Symbol News: उद्धव ठाकरेंच्या देवघरातील धनुष्यबाणही शिंदेंचा? मुख्यमंत्री म्हणाले मी बोललो तर...

दिलेल्या गोष्टी काढत नाही, मी बोललो तर अनेकांच्या अडचणी होतील

सकाळ डिजिटल टीम

Shivsena News: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्हं आणि नाव एकनाथ शिंदे गटाला दिलं. त्यानंतर ठाकरे गटाकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले. तर उद्धव ठाकरे यांनी बोलताना निवडणूक आयोगाने कागदावरचे धनुष्यबाण मिंधे गटाला दिले असले तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे खरे धनुष्यबाण माझ्याकडे आहे. शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुखांनी हे चिन्ह देव्हाऱ्यात ठेवलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं होतं. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी एक ट्वीट केलं होतं.

शीतल म्हात्रे यांनी आपल्या ट्वीटमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिलेला होता, असं म्हटलं होतं. शीतल म्हात्रेंनी केलेल्या या ट्विटची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली. दरम्यान, यावर पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी यावर हसून उत्तर दिलं आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता, मी दिलेल्या गोष्टी काढत नाही. मी बोललो तर अनेकांच्या अडचणी होतील, असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही. मला बोलायला लावू नका. मी बोललो तर अनेकांची अडचण होईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. आम्हाला संपत्तीचा मोह नाही, कधीही नव्हता. आम्हाला कुणाचीही संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. याउपर आम्हाला बोलायचं नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी जाहीर करत सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर आता सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा दोन्ही गट एकमेकांना लक्ष्य करताना दिसून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: 38 व्या वर्षीच नोकरीला रामराम! वर्षाला 2 कोटी कमावणाऱ्या इंजिनिअरने उघडलं साइड कमाईचं सीक्रेट

संजय कपूर अन् शाहीरच्या सूडाचा खेळ; 'अब होगा हिसाब २' चा ट्रेलर आऊट

Cancer Care: राज्य कर्करोग संस्थेत अत्याधुनिक पेट-सीटी स्कॅन सेवा सुरू; मराठवाड्यातील कर्करोग रुग्णांना मोफत व परवडणाऱ्या निदानाचा मोठा दिलासा

Latest Marathi News Live Update : जळगावात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू जन्य साठ्यावर कारवाई

Kidney Patient: माणुसकीचा सुंदर आविष्कार! किडनीग्रस्त सहकाऱ्याच्या मदतीला धावले शिलेदार, कर्जतमध्ये माणुसकीचा प्रेरणादायी आदर्श

SCROLL FOR NEXT