महाराष्ट्र

स्मारकाबद्दल अभिमान असेल तर...; शुद्धिकरणावरून राणेंचा टोला

सकाळ डिजिटल टीम

राणेंनी पहिल्याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन केले होते. त्यानंतर शिवसैनिकांकडून स्मारकाजवळ गोमूत्र शिंपडून शुद्धिकरण करण्यात आले.

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. राणेंनी पहिल्याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन केले होते. त्यानंतर शिवसैनिकांकडून स्मारकाजवळ गोमूत्र शिंपडून शुद्धिकरण करण्यात आले. यावर नारायण राणेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे. जागतिक दर्जाची अनेक स्मारके पाहिली आहेत. तिथं लॉन, फुलझाडे आहेत. मात्र इथं बाळासाहेबांचा फोटोही नीट दिसत नाही असं राणे म्हणाले.

स्मारकाबद्दल अभिमान असेल तर तिथली परिस्थिती एकदा बघा. स्मारकाजवळ जायचं म्हटलं तर परिसरात दलदल आहे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात असं राणेंनी म्हटलं. गोमूत्र शिंपडायला आलेल्यांवर राणेंनी निशाणा साधला. ते म्हणाले की, गोमूत्र शिंपडून तिथं शुद्धिकरण करण्यापेक्षा स्वत:चं मन शुद्ध करा आणि कारभार करा. बाळासाहेबांचं स्मारक जागतिक किर्तीचं स्मारक व्हावं असं वाटतं.

जनआशीर्वाद यात्रेत मोदींनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडणार असल्याचं राणेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले की, 'कुपोषित बालकांसाठी मोदींनी नवीन योजना आणली. गोर गरिबांना अन्न देण्यासाठी 1 लाख 70 हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे.' नारायण राणेंनी संजय राठोड यांचे नाव घेत शिवसेनेवर हल्लाबोल केला. राठोड संत आहे का? कामं मोजायची असतात ते गुन्हे मोजतायत. शिवसैनिक कसे वागतात? हे जवळून पाहिलं आहे. वेळ येताच सगळं समोर आणेन असं राणे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi : ''माझं लेकरु तुम्हाला सोपवत आहे... तो तुम्हाला निराश करणार नाही'', सोनिया गांधी भावुक

Parveen Hooda : ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का; परवीन हुड्डा ऑलिम्पिक कोटा गमावणार?

Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Shashank & Gashmeer : शशांक-गश्मीरची पुन्हा जमली जोडी; 'या' प्रोजेक्टमध्ये करणार एकत्र काम

Latest Marathi News Live Update : रायबरेलीतील सभेत बोलताना सोनिया गांधी भावुक

SCROLL FOR NEXT