महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari : "विरोधीपक्ष नेता असताना..." ; जुन्या आठवणी सांगताना नितीन गडकरी भावूक

Sandip Kapde

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. २००४ साली झालेल्या एका अपघाताच्या घटनेने गडकरी भावूक झाले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, "माझ्या आयुष्यातील घटना आहे की २००४ मध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता असताना पोलीस संरक्षणामध्ये माझा अपघात झाला होता. लाल दिव्याची गाडी होती. सोबत माझा सर्व परिवार होता. गार्ड सोबत होते. समोर दोन-तीन गाड्या, मागे चार-पाच गाड्या यावेळी अपघात झाला. गाडी पूर्ण ट्रकच्या खाली गेली होती. ज्यांनी गाडी पाहीली त्यांचा विश्वासचं बसला नाही की कोणी जिवंत राहीलं असेल. मात्र मी आणि माझा परिवार सुखरूप बचावलो."

मला एकाने विचारलं हे कसं झालं. तर मी १९८० ला आमदार झालो तेव्हापासून आजपर्यंत जवळपास ३० ते ३५ हजार हार्टचे ऑपरेशन मोफत करुन देण्याचा उपक्रम केला. ज्यावेळी गरीब लोक माझ्याकडे येतात. ते माझ्यासोबत फोटो काढतात. त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात. ते आशीर्वाद देऊन जातात. त्यामुळे मी या गोष्टीवर विश्वास ठेवतो की ते लोक जो आशीर्वाद देऊन जातात. त्यामुळेचं माझे प्राण वाचले, असे गडकरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT