महाराष्ट्र बातम्या

CM उद्धव ठाकरेंचा जनतेला मोठा इशारा, घेतला सर्वात मोठा निर्णय

नामदेव कुंभार

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राज्य निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मॉल, रेस्टॉरंट, दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत आणि खासगी कार्यालयांना २४ तास खुली ठेवण्याची मुभा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, निर्बंध शिथिल करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लॉकडाउनचा इशारा दिला आहे. तिसऱ्या लाटेचे स्वरूप दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक असण्याचा अंदाज केंद्रीय आरोग्य विभागाने वर्तविला असल्याने राज्याची ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेऊन ७०० टन ऑक्सिजनची गरज जेव्हा राज्याला भासेल तेव्हा तातडीने राज्यात लॉकडाउन केला जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

आपल्यामुळे इतरांच्या आयुष्याला धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. सध्या निर्बंधामध्ये शिथिलता दिली असली, तरीही जबाबदारीने वागा. तिसऱ्या लाटेची शक्यता दिसल्यास पुन्हा कडक लॉकडाउन लावण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मास्क, सुरक्षित अंतर, हात धुणे ही त्रिसूत्री सर्वांनीच पाळणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले

निर्बंध शिथिल केले असते आणि तिसली लाट येमार की नाही याचा अंदाज घेत असलो तरी विषाणूच्या बदल्यात अवतारापासून सावध राहिलं पाहिजं. दुसऱ्या लाटेवेळी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे केवळ आपल्यालाच नव्हे तर देशासमोर कसं आव्हान उभं ठाकलं ते अजून ताजं आहे. राज्यातील निर्बंध किंवा लॉकडाउन लावताना ऑक्सिजनची गरज हा निकष असेल. राज्यातील कोविड रुग्णांसाठी दरररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागू लागला की राज्यात कडक लॉकडाउन लावला जाईल. सुमारे 30 हजार रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज भासू लागली की निर्बध लावण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train Tunnel : समुद्राखालील बुलेट ट्रेन बोगद्याला वेग; दुसऱ्या टीबीएमने खोदकामाला सुरुवात

Rohit Sharma Retirement: 'सचिन-गावसकरही गेले, रोहितलाही जावं...' हिटमॅनच्या निवृत्तीच्या चर्चांवर कपिल देव यांचं विधान चर्चेत

Ahmedabad Fire: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; स्फोटांनी हादरला परिसर, ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, कुठे घडली घटना?

Mumbai News: केईएमच्या कारभाराची मध्यरात्री पाहणी, डॉक्टरांची अनुपस्थिती; रुग्णांच्या उपचारात विलंब

Mumbai News: बदनामी करू नका, महेश ट्युटोरियलन्सने ३३ शाखा बंद करण्याचं सांगितलं कारण; मुंबईत ३० हजार क्लासेस सुरू

SCROLL FOR NEXT