mamata Banerjee 
महाराष्ट्र बातम्या

आता UPA राहिलेली नाही, फक्त जाहीर करायचं बाकी - ममता बॅनर्जी

काँग्रेसबाबतच्या विधानावर शरद पवारांचाही ममतांना पाठिंबा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भाजप्रणित एनडीएला पर्याय म्हणून संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचा जन्म झाला होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी युपीएचं नेतृत्व करताना आघाडीला देशात दोन वेळेत सत्ता मिळवून दिली. पण सध्या पुन्हा एनडीएचं सरकार सत्तेत असताना युपीए मात्र निष्प्रभ्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर "आता युपीए राहिलेली नाही, याबाबत आता फक्त घोषणा करणंच बाकी आहे," असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तीन दिवसीय मुंबई दौऱ्यादरम्यान बुधवारी त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर संयुक्तरित्या पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं.

बॅनर्जी माध्यमांशी बोलत असताना पत्रकारांनी त्यांनी प्रश्न विचारला की, शरद पवार युपीएमधील सर्वात वरिष्ठ नेते आहेत त्यामुळं तुम्हाला असं वाटतं का की शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करायला हवं? या पत्रकारांच्या प्रश्नावर काहीशा संतापलेल्या स्वरात ममता म्हणाल्या, "अरे तुम्ही युपीएची काय भाषा करता, आता युपीए राहिलेली नाही. आता फक्त हे जाहीर करायचं बाकी राहिलंय"

दरम्यान, "आज ज्या प्रकारे देशात फॅसिझम सुरु आहे, त्याविरोधात सक्षम पर्याय निर्माण झाला पाहिजे पण हे कोणा एकट्याचं काम नाही. जो सक्षम आहे त्याला घेऊन हे करावं लागेल. भाजपविरोधात लढणारा सक्षम पर्याय असायला हवा. कोणी लढायला तयार नाही त्याला आम्ही काय करणार?" अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडलं.

ममतांच्या विधानाचं स्वागत - शरद पवार

"नेता रस्त्यावर राहिला तरच त्या पक्षाचा विजय होतो, पण राहुल गांधी कायम परदेशात असतात" अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींवर खोचक टीका केली होती. यावर पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं असता ते म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये ममतांचा जो विजय झाला तो त्यांच्या मेहनतीनं झाला आहे. त्यामुळं त्यांचा वैयक्तिक अनुभावावरुन त्यांनी हे विधान केलं, ज्याचं आम्ही स्वागत करतो"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Politics : निमित्त दिवाळी शुभेच्छा, कोल्हापूरचे दादा, इचलकरंजीच्या आण्णांना भेटले; मिशन झेडपी ते महापालिका काय झाली चर्चा...

'गुप्तांगाला स्पर्श करणेही बलात्कारच'; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय; ड्रायव्हरने दोन मुलींवर केला होता अत्याचार

Navi Mumbai Fire : नवी मुंबईत सिलिंडरचा स्फोट, माय-लेकीचा होरपळून मृत्यू; ऐन दिवाळीत कुटुंबावर शोककळा

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाक; बुलढाण्यात बच्चू कडू यांचा संताप

SCROLL FOR NEXT