महाराष्ट्र बातम्या

पुढील दोन-तीन दिवसांत राज्यात अतिमुसळधार? हवामानचा इशारा

स्नेहल कदम

या चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

रत्नागिरी - काल सायंकाळापासून तयार झालेले गुलाब चक्रीवादळ हे पूर्व किनारपट्टीवरील पुढे सकरत आहे. आज मध्यरात्री (रविवार) गोपाळपूर आणि कलिंगपट्टणममध्ये धडकण्याची शक्यता आहे. यामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे 2-3 दिवस राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी पावसाची आणि वाऱ्याची तीव्रता अधिक असू शकते, असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, या चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर होणार आहेत. राज्यात २७ ला मराठवाडा, विदर्भात आणि २८ तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रशासानाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT