Prakash Ambedkar vs Ramdas Athawale esakal
महाराष्ट्र बातम्या

Akola : आठवलेंच्या 'त्या' वक्तव्याची प्रकाश आंबेडकरांनी इज्जतच काढली; म्हणाले, काही महाभाग..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत रिपाइंचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मोठं वक्तव्य केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत रिपाइंचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मोठं वक्तव्य केलं होतं.

अकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) विजया दशमी (Vijaya Dasami) दिवशी बौद्ध धर्म (Buddhism) स्वीकारला होता. पण, बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा नसताना त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं होतं. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आठवलेंनी हे धक्कादायक विधान केलं होतं. मात्र, आठवलेंच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) जोरदार टीका केली.

आता अनेक गोष्टी चालल्या आहेत. कुणाचं तरी गुणगान गातात, कुणी लोटांगण घालतात आणि काही जण मंत्रिपद कायमचं टिकलं पाहिजे म्हणून येड्यासारखं बडबड करतात. विजया दशमीला (Dhamma Chakra Pravartan Din 2022) जाणीवपूवर्क विचारपूर्वक बाबासाहेबांनी हे पाऊल उचललं. कारण, जो बहिष्कृत वर्ग होता त्याचे बहिष्कृतपण निघाले पाहिजे, त्याला माणसाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याला समतेचा अधिकार मिळाला पाहिजे. त्याला इज्जतीनं जगता यावं. म्हणून त्यांनी बुद्धाच्या विचाराची कास धरली, असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी आठवलेंच्या (Ramdas Athawale) त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

प्रकाश आंबेडकर पुढं म्हणाले, आज काही महाभाग असे म्हणायला लागले की चुकून माकून बाबासाहेबांनी हा मार्ग घेतला. दुर्दैवानं जे-जे विचारवंत अशा नेत्यांच्या पाठीमागे उभे राहतात. मला त्या विचारवंताची कीव करावी वाटते. बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती विचारपूर्वक चालली. परंतु, त्या विचारपूर्वक उचललेल्या पावलाला स्वत:च्या व्यक्तिगत फायद्यासाठी आता काही जण बाबासाहेबांचे ते पाऊल चुकीचं होतं, असं म्हणताहेत. अशा विचारवंताचा त्यांच्या नेत्यांचा आम्ही या जाहीर सभेमध्ये धिक्कार करतो, असं ते म्हणाले. अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत ते बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT