Prakash Ambedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

प्रकाश आंबेडकरांना ED ची नोटीस; म्हणाले, ### दम असेल तर मला उचलून दाखवा

सकाळ डिजिटल टीम

देशात भाजपनं दडपशाहीचं राजकारण सुरू केलंय.

अमरावती : देशात भाजपनं (BJP) दडपशाहीचं राजकारण सुरू केलंय. उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस (ED Notice) दिल्या जातात. भाजपानं देशात मोकळं वातावरण ठेवलं नाहीय. मलाही ईडीची नोटीस दिली होती; पण ### दम असेल तर मला उचलून दाखवून कारवाई करावी. मग बघा काय होते ते, असे म्हणतं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) भाजपला आणि तपास यंत्रणांना थेट आव्हान दिलं. मात्र, यावेळी आंबेडकरांची जीभ घसरली होती.

राज्यातल्या ईडीच्या कारवाईवरून (ED Notice) अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांवर सवाल उपस्थित केले जात आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप यावरून रोज एकमेकांवर तुटून पडत आहेत. केंद्रीय तपाय यंत्रणा या भाजपच्या (BJP) सांगण्यावरून सुडभावनेनं कारवाई करत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून (Vanchit Bahujan Aaghadi) होते, तर यात आमचा कोणताही सहभाग नसल्याचं भाजप सांगत आहे. मात्र, यावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरलीय. भाजपानं देशात मोकळं वातावरण ठेवलं नाहीय, मलाही ईडीची नोटीस दिली होती, ###दम असेल मला उचलून दाखवून कारवाई करावी, असं थेट आवाहन आंबेडकरांनी भाजपला दिलंय.

तसेच इतर काही मुद्द्यांवरही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी भाष्य केलं. निवडणुकीबाबत दिलेल्या निर्णयावर ताबडतोब निर्णय घ्या हे सांगण्या ऐवजी तुम्ही निर्णय घ्या हे सांगणे घटनेला धरून नाही, अशी टीका आंबेडकरांनी केलीय. तसेच सभा अस्तित्वात नसतांना टॅक्स गोळा करण्याचा अधिकार आहे? यावर सगळ्या पक्षांनी आपलं मत मांडले पाहिजे, असंही ते म्हणाले. तर देशातील सध्याच्या धार्मिक राजकारणावर बोलताना ते म्हणाले, काश्मीरमध्ये साडे तीन जिल्हे आहेत, ज्याठिकाणी 5 लाख आर्मी उभी करूनही हा भाग ताब्यात घेऊ शकले नाही. त्यामुळे मुस्लिमांमधील (Muslim) वर्ग आणि हिंदू मधला वर्ग या दोघांनी आता पूर्ण ताबा घेतला पाहिजे तरच अशा दंगली थांबतील, असं मत त्यांनी यावेळी मांडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 5th T20I: हार्दिक पांड्या पेटला, अभिषेक शर्माचा विक्रम मोडला; तिलक वर्माच्या साथीने भारताला गाठून दिला २३० धावांचा टप्पा

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडे तरुणांची गर्दी; ५०० इच्छुकांच्या मुलाखती!

Uruli Kanchan Crime : उरुळी कांचन हद्दीत खुनाची घटना; संशयिताच्या शोधासाठी तीन तपास पथके रवाना!

Sinhagad Fort Exhibition : सिंहगडावर शिवकालीन वैभवाचा जागर; ९९ दुर्ग प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन!

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

SCROLL FOR NEXT