Varsha Gaikwad  sakal media
महाराष्ट्र बातम्या

शिक्षक भरती संदर्भात शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; गायकवाड म्हणाल्या..

आज सभागृहात मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज सभागृहात मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे.

मागील काही दिवसांपासून शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरून अनेक चर्चा सुरु आहेत. यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेकवेळा टोलेबाजीही झाली आहे. मात्र आता शिक्षक भरती संदर्भात राज्य सरकारने (Maharashtra Govt.) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. जिथे शिक्षक कमी आहेत तिथे शिक्षकभरती केली जाणार असून अतिरिक्त असतील तिथे त्यांचं समायोजन केलं जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. आज सभागृहात त्यांनी ही घोषणा केली आहे. याच महिन्याभरात या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Teachers Recruitment)

अनेक दिवसांपासून हा शिक्षक भरती रखडली असल्याने अनेकवेळा शिक्षकांकडून आंदोलने झाली. संबंधित अनेक संघटनांनी मोर्चे काढले मात्र तरीही राज्यसरकारला जाग येत नसल्याने विरोधकांनी राज्यसरकारला धारेवर धरलं होतं. मात्र आता या घोषणेमुळे शिक्षकांत पुन्हा एकदा उत्साहाते वातावरण पसरले आहे.

दरम्यान, येत्या वर्षभरात राज्यातील सर्वच शासकीय शाळांमध्ये सीटीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावणार असल्याची घोषणाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली आहे. राज्यातील शासकीय शाळेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय शाळेत वर्षभरात टप्प्या टप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्यात एकूण 65 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft AI Policy : ६० हजार कर्मचाऱ्यांसमोर स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव, त्यातच मायक्रोसॉफ्टच्या धोरणांवर टीका; एआयमुळे नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी त्रस्त?

Flight Hijack Scare : विमानाचे उड्डाण होणार इतक्यात टॉयलेटच्या आरशावर दिसला 'तो' मेसेज; १०५ प्रवाशांचा जीव टांगणीला!

Latest Marathi News Live Update : वाशिम जिनिंगमध्ये उघड्यावर साठवून ठेवलेल्या दहा हजार क्विंटल कापसाला आग

China Economic Crisis : चीनच्या अर्थव्यवस्थेची दोन टोके; तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती, मात्र बेरोजगारी आणि घसरत्या गुंतवणुकीमुळे आर्थिक आव्हाने कायम

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा CRPF चौकीवर गोळीबार; तीन जवान जखमी

SCROLL FOR NEXT