varsha gaikwad 
महाराष्ट्र बातम्या

पहिली ते आठवीचे विद्यार्थी सरसकट पास; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात राज्यात काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन, तर काही विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण मिळाले आहे. अशात बऱ्याच शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नाही. परिणामी राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करणे शक्य नाही. त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांने वार्षिक मूल्यमापन न करता सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 

हे वाचा - लॉकडाऊन करणार का? उद्धव ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या वर्षीपासून शाळा बंद आहेत. राज्यात काही भागात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले होते. परंतु इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग वर्षभरात सुरू होऊ शकलेले नाहीत. तसेच अभ्यासक्रमही पूर्णपणे शिकवून झालेला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करणे योग्य राहणार नाही, त्यामुळे मूल्यमापन न करता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात (वर्गोन्नती) पाठविण्यात यावे, असा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी दुपारी जाहीर केला.

ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सुरू झालेले शैक्षणिक वर्ष संपत असले असताना इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा प्रश्न राज्यातील शिक्षकांसमोर होता. शहरी भागात अनेक शाळांमध्ये ऑनलाइन पद्धतीने वार्षिक परीक्षा घेतल्या जात आहेत. पण निकालाच्या, मूल्यमापनाच्या कार्यवाहीबाबत शालेय शिक्षण विभागाच्या सूचनांची प्रतीक्षा शाळांना होती. गायकवाड यांनी राज्य सरकारची भूमिका जाहीर केल्याने शाळांची ही प्रतीक्षा शनिवारी संपली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagannath Patil: कॅमेरा बंद कर, नाही तर फेकून देईल, भाजपाचे माजी मंत्री पत्रकारांवर संतापले

Dada Bhuse : सन्मानजनक जागा न मिळाल्यास भाजपला डच्चू? दादा भुसे यांनी दिले युतीचे संकेत

बाबो! भाईजानला पाहून सगळेच शॉक! 60 व्या बर्थडेला सलमान खानची सायकलवरुन खास एन्ट्री, नेटकरी म्हणाले...'ये तो अभी जवान...'

Latest Marathi News Live Update : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ वाशिममध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे निदर्शनं

Raigad Tourism : रायगड जिल्ह्यात नाताळ आणि नववर्षासाठी पर्यटन स्थळे हाऊसफुल्ल; ऐतिहासिक पर्यटनाची वाढती मागणी!

SCROLL FOR NEXT