Varsha Gaikwad  esakal
महाराष्ट्र बातम्या

चला मुलांनो चला, शाळेत जाऊ चला; शिक्षण मंत्र्यांची कविता वाचली का?

शिक्षण विभागाने दिलेल्या नियमावलीनुसार शाळेत जाण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे.

सकाळ डिजिटल टीम

डिसेंबर २०२१ च्या अखेरीस कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं. त्यानंतर देशासह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. (School Reopening) खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाने उपाययोजनेचं आवाहन केलं. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू-बंद असा लपंडाव सुरू झाला आहे. शाळा सुरू होऊन दोन आठवडे झाले नाहीत तोच पुन्हा फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाच्या (Covid -19) वाढत्या रुग्णांमुळे शाळांना ऑनलाइन शिकवणी वर्ग पर्याय ठेवण्यात आला होता. मात्र अलिकडे कोरोनाची परिस्थिती पाहत आणि पालकांच्या मागणीमुळे आजपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) शाळा सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणा केल्यानंतर आज शाळा सुरु होणार या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्वीटरवर एक कविता पोस्ट केली आहे. चला मुलांनो चला! (chala mulano chala) या शीर्षकाची ही कविता सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

मागील वर्षापासून ऑनलाइन वर्गावरच शिक्षण सुरू आहेत. या ऑनलाइन वर्गात अनेक अडचणी येत असल्याने प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात यावे यासाठी पालक तसेच शिक्षक आक्रमक झाले होते. विद्यार्थ्याच्या समस्या सोडवायच्या असल्यास त्यासाठी प्रत्यक्ष वर्ग सुरू होणे आवश्यक असल्याने शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले होते. शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्याने सकारातमकता दाखवत अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडण्यात आला आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या नियमावलीनुसार शाळेत जाण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. विद्यार्थी किंवा त्याच्या घरातील कोणीही आजारी असल्यास विद्यार्थ्याला शाळेत पाठवण्यात येऊ नये, अशीही सूचना करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan: शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी! कृषिमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितली तारीख; कर्जमाफीचा निर्णय कधी?

Jalgaon Gold Market : सोने-चांदीच्या भावात मोठी पडझड! चांदी तब्बल २४ हजारांनी स्वस्त, जळगावच्या बाजारपेठेत खळबळ

Gorai Bus Depot Python : मुंबईकरांनो सांभाळून! गोराई बस डेपोत शिरले दोन महाकाय अजगर; पाहा रेस्क्यूचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Petrol Diesel Price Maharashtra : अमेरिका-इस्त्रायल, इराण युद्धाचा परिणाम; महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल -डिझेलचे दर घ्या जाणून

Maharashtra RTO Recruitment : सरकारी नोकरीची मोठी संधी ! राज्य परिवहन विभागात होणार तब्बल 'इतक्या' जागांवर मेगा भरती

SCROLL FOR NEXT