Sharad Pawar News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: '...ते दोन राजकीय बॉम्ब फुटल्यानंतरच राज्यातील राजकारण स्थिर होईल', बड्या नेत्याचा दावा

भाजपची सत्ता असलेल्या केंद्र व राज्य सरकारांच्या विरोधात सध्या सर्वसामान्यांचा कल

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Political News: राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप बरेच काही राजकारण घडायचे बाकी आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल (बुधवारी) केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले अजून दोन राजकीय बॉम्ब फुटायचे बाकी आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण स्थिर होईल, असा दावाही आंबेडकर यांनी केला आहे.

अकोला दंगलीसंदर्भात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणावर वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची परिस्थिती असल्याची काँग्रेसने भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये बरेच राजकारण घडायचे बाकी आहे. त्यानंतर जे काही बाहेर पडेल ते खरे बाहेर पडेल, असे मी मानतो असंही ते म्हणाले आहेत.

राज्यात धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न सुरू असून दंगेखोरांवर कडक कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या दंगली थांबणार नाहीत.

कर्नाटकमध्ये धार्मिकतेवर नाही तर तेथील मतदारांनी त्यांना जे योग्य वाटले त्यांना मतदान केले. त्यामुळे दंगलीतून मतदान बदलेल असा जो पूर्वीचा काळ होता तो आता संपुष्टात आलेला आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महाराष्ट्रातील जनमत भाजपविरोधात: शरद पवार

भाजपची सत्ता असलेल्या केंद्र व राज्य सरकारांच्या विरोधात सध्या सर्वसामान्यांचा कल असून, त्यामुळेच कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता मतदारांनी घालवली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बुधवारी येथे केले.

कर्नाटकचा हा कल महाराष्ट्र सरकारच्या विरोधातही दिसतो. यामुळे आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढायच्या आहेत. यामुळे आपापसातील मतभेद गाडून महाविकास आघाडी कशी भक्कम होईल याचा प्रत्येक नेत्याने व आमदाराने विचार करावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात भाजपला धक्का! पदवीधर निवडणुकीत नाट्यमय घडामोडी, काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी

Maharashtra Rain : ‘अर्नब’ चक्रीवादळाचा आंध्रप्रदेशला मोठा फटका, महाराष्ट्रातही वातावरण बदलले; 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता

IND vs NZ: भारताविरुद्ध आधी मालिका गमावली अन् आता न्यूझीलंडचे दोन प्रमुख गोलंदाज शेवटच्या T20I सामन्यांमधून बाहेर, कारण काय?

Gokul Dairy Employees : नेत्यांसाठी कायपण! 'गोकुळ' निवडणुकीत ताळतंत्र सोडलं; कामावर दांडी मारून प्रचारात फिरणाऱ्या 350 कर्मचाऱ्यांना पाठवल्या नोटिसा, प्रशासकांचा दणका

Pune Election News: विरोधकांचे पारडे जड! ‘पदवीधर’ महाविकासकडे ‘शिक्षक’ महायुतीकडे; पुण्यातून हर्षदा देशमुख, कौस्तुभ गावडे विजय

SCROLL FOR NEXT