Vedang-Asgaonkar 
महाराष्ट्र बातम्या

JEE Main 2020 : पुण्याचा वेदांग आसगांवकर ठरला महाराष्ट्राचा टॉपर!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्‍यक असलेल्या 'जेईई मेन' परीक्षेचा निकाल शनिवारी (ता.18) जाहीर करण्यात आला. यामध्ये पुण्यातील वेदांग आसगांवकर याने 99.99 पर्सेंटाइल गुण मिळवत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुण्यातून साधारणातः 1200 ते 1300 विद्यार्थी 'आयआयटी' प्रवेशासाठी 'जेईई ऍडव्हान्स'साठी पात्र ठरल्याचा अंदाज अभ्यासकांचा आहे.

देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) आणि इंजिनियरींग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) पहिली जेईई मेन्स (जॉइंट एंट्रन्स एक्‍झामिनेशन) परीक्षा 7 व 9 जानेवारी यादरम्यान घेण्यात आली होती.

या परीक्षेसाठी देशभरातून 9 लाख 21 हजार 261 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 लाख 69 हजार 10 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात मुलींची संख्या 2 लाख 64 हजार 26, तर मुलांची संख्या 6 लाख 4 हजार 981 इतकी आहे. तर तीन ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 'एनटीए'ने जेईई मेनचा निकाल संकेतस्थळावर आज जाहीर केला. 

दरम्यान, 'जेईई मेन्स'ची दुसरी परीक्षा 5 ते 11 एप्रिल दरम्यान होणार आहे. या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये ज्या विद्याथार्यांना सर्वोत्तम गुण मिळाले आहेत, त्या आधारावर 'जेईई ऍडव्हान्स'साठी पात्रता स्पष्ट होणार आहे.

निकालाचे विश्लेषन करताना आयआयटीन्स केंद्राचे संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर म्हणाले, यंदाच्या आणि गेल्यावर्षीच्या निकालाची तुलना करता पर्सेंटाईलमध्ये खुप फरक नाही. या निकालावरून खुल्या गटात 90 पर्सेटाईल, तर ओबीसी गटात 75 पर्सेटाईल गुण मिळालेली विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरण्याची शक्‍यता आहे. पुण्यातून 1200 ते 1300 विद्यार्थी पात्र ठरतील अशी शक्‍यता आहे. 

यंदा सहा सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. काही सत्रात प्रश्‍नपत्रिका एकदम सोपी, तर काहींमध्ये काठीण्य पातळी अवघड होती. त्यामुळे प्रत्येक सत्रांतील गुणांमध्ये तफावत असली तरी पर्सेटाईल गुणांत त्याचा फरक पडलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT