Vedanta Foxconn Project employment Aaditya Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Vedanta Foxconn : प्रकल्प राज्यात, मुलाखती चेन्नईत!

आदित्य ठाकरे : मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने भूमीपुत्रांवर अन्याय?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वेदांत-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प परराज्यात गेल्यानंतर राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी रोजगाराच्या संधी देखील दुसऱ्या राज्यात चालल्या आहेत. भूमीपुत्रांवरील हा अन्याय मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने होतोय का, असा सवाल शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. लोकांच्या हिताचे काम करणाऱ्या मविआ सरकारला पाडून सत्तेवर आलेल्या या सरकारने याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी बुधवारी केली.

मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी विविध पदांसाठी स्थापत्य अभियंत्याच्या नोकर भरतीच्या मुलाखती चेन्नईमध्ये होणार असल्याची धक्कादायक माहिती आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत समोर आणली. ते म्हणाले, ‘‘वर्सोवा वांद्रे सी लिंकच्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली की नाही माहीत नाही. पण गेले सात वर्षे त्यांच्याकडेच ‘एमएसआरडीसी’ विभाग आहे. या प्रकल्पाचे काम रखडले म्हणून तो दुसऱ्या कंत्राटदाराकडे दिला आहे. या कंपनीने विविध पदांच्या भरतीच्या मुलाखतीचे आयोजन चेन्नईत केले आहे. महाराष्ट्राच्या मुलांसाठी मुंबईसह राज्यात कुठेच मुलाखतीचे केंद्र नसल्याबाबत सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

हे सगळे मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने चालले आहे का किंवा मग मुख्यमंत्र्यांचा धाक नाही. यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रातील अभियंत्यांना महाराष्ट्रात संधी का नाही, चेन्नईत मुलाखती कशासाठी, चेन्नईला जाण्याचा खर्च सरकार करणार आहे का, अशी प्रश्‍नांची सरबत्ती ठाकरे यांनी केली.

‘गद्दारांना आमचे काम दिसले’

गेल्या दोन आठवड्यात ‘एमटीएचएल’ची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच याचे ८० टक्के काम पूर्ण झाले होते. तसेच त्यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. जी कामे उद्धव ठाकरे यांनी सुरू केली, ती काम आता ६० टक्क्यांवर पूर्ण झाली आहेत, याचा मला आनंद आहे. त्याची पाहणी आता सुरू आहे. त्यामुळे ४० गद्दारांना आमचे काम दिसत असल्याचा शालजोडीतला त्यांनी लगावला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे द्वितीय चिरंजीव तेजस ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश होणार का, या चर्चेकडे लक्ष देऊ नका. ते त्यांच्या ‘वाइल्ड लाइफ’मध्ये व्यग्र आहेत. इकडे आमचे वेगळेच ‘वाइल्ड लाइफ’ सुरू आहे.

- आदित्य ठाकरे शिवसेना नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT