Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Vedanta Foxconn : ठाकरे गटाच्या दिरंगाईमुळेच प्रकल्प राज्याबाहेर; MIDC ची माहिती

त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरुन चांगलाच गदारोळ माजला आहे. अशातच आता या गदारोळात नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प ठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे राज्यातून बाहेर गेल्याची माहिती हाती आली आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरुन विरोधकांनी शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. मात्र आता हा प्रकल्प ठाकरे सरकारच्या दुर्लक्षामुळेच बाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती समोर आली आहे. MIDC कडून ही माहिती देण्यात आली आहे. साडेचार महिने ठाकरे सरकारकडून प्रकल्पविषयक कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. राज्यात प्रकल्प राहावा म्हणून काहीही प्रयत्न झाले नाही, असा खुलासा या अंतर्गत करण्यात आला आहे.

त्यामुळे आता हा ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. जवळपास ४ प्रकल्प आजपर्यंत राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे सातत्याने यावरुन सरकारच्या धोरणांवर टीका केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Injury Updates: मुंबई इंडियन्ससह ८ संघांना बसलाय दुखापतीचा फटका; आतापर्यंत १४ खेळाडूंनी वाढवली फ्रँचायझींची डोकेदुखी

मिरा-भाईंदरमध्ये नवे वाहनतळ उभारणार, वाहतूक कोंडी कायमची फुटणार; पालिकेचा मोठा निर्णय

जीजी झाली मॉडर्न! 'येड लागलं प्रेमाचं' मधून एक्झिट घेताच नव्या मालिकेत दिसणार नीना कुळकर्णी; नेटकरी चकीत

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड शहरातील डी. वाय. पाटील रुग्णालयातून ५.२२ लाखांची इंजेक्शने लंपास

Sugar industry: राज्यातील साखर उद्योग सापडला आर्थिक कोंडीत; अनुदानाची टांगती तलवार, ३०० कोटींचा ‘ट्रेझरी’ प्लॅन!

SCROLL FOR NEXT