Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Vedanta: सरकारचा विरोधकांवरच पलटवार; फडणवीस रशियातून परतल्यावर होणार चर्चा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या उदासिनतेमुळे वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातेत गेल्याचा आरोप भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री रशियाला गेले आहेत ते आल्यावर या बाबतीत सविस्तर चर्चा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.

(Vedanta & Foxconn Latest Updates)

वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्पावरून सध्या राज्यातील राजकारण पेटलं आहे. तर विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात असून सत्ताधाऱ्यांकडून मात्र महाविकास आघाडीवर पलटवार केला जात आहे. हा प्रकल्प मविआमुळे गुजरातला गेल्याचा आरोप केला जात आहे. मविआने नीट वाटाघाटी केली नाही म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेला असून यापुढे एकही प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही असं आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या रशियात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी गेले आहेत. ते आल्यावर वेदांता प्रकल्प गुजरातला कसा गेला यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले असून कोकणातील रिफायनरी आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत चर्चा करणार असल्याचं बोललं जातंय. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर कोकणात होणारा रिफायनरी प्रकल्पही राज्याबाहेर जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

Marathi Language : इस्रायलमध्ये मराठीचा झेंडा! इवा तळेगावकरांनी परदेशात जपली मातृभाषेची ओळख

Government Subsidy Disabled: आनंदाची बातमी! दिव्यांगाच्या टुलकिटसाठी १५ हजारांचे अनुदान; लवकरच हाेणार अंमलबजावणी, 3९ वर्षांनंतर अनुदानात वाढ..

SCROLL FOR NEXT