Vidarbha Accident e sakal
महाराष्ट्र बातम्या

Vidarbha Accident : विदर्भात गेल्या १२ तासात झाले ३ अपघात ; १६ जण जखमी ; ४ जण ठार

सकाळ डिजिटल टीम

Vidarbha Accident : गेल्या 12 तासात विदर्भामध्ये तीन मोठे अपघात झाले असून यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यातला एक अपघात समृद्धी महामार्गावर झाला आहे.

बुधवारी रात्री एकच्या सुमारास समृद्धी महामार्गावर ट्रकचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. झोप लागल्याने चालक आणि वाहकाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सरद ट्रक नागपूर येथून मुंबईकडे निघाला होता. रात्रीच्यावेळी झोप लागल्याने पुलाच्या सिमेंट कठड्यावर ट्रॅक धडकला. समृद्धीवर ट्रक वेगात होता. भरधाव ट्रक इतका जोरात धडकला की ट्रकच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

तर दुसरीकडे वर्धा जिल्ह्यात अपघात झाला आहे. तीन युवक दुचाकी वरून अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणावर आले होते. सायंकाळी घरी परत असताना त्यांचा अपघात झाला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तिसरा अपघात हा बुलढाणा जिल्ह्यात झाला आहे. सौना ते चिखली मार्गावर एका एसटी बसचा अपघात झाला आहे. या एसटी बसमध्ये 25 प्रवासी होते. 25 पैकी 10 ते 15 प्रवासी हे या अपघातात जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SC Rejected Walmik Karad Bail : सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मीक कराडला सुप्रीम कोर्टाचा दणका

Nagpur : चोर सोडून संन्याशाला शिक्षा! महिलेवर हल्ला करणारा मारकुटा वळू राहिला बाजूला, दुसऱ्यालाच पकडलं; नागपूर महापालिकेचा अजब कारभार

Video : हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घडवला इतिहास! लाँच केले मिनी सॅटेलाईट; शेतीसाठी ठरेल उपयुक्त, अभिमानास्पद व्हिडिओ व्हायरल

सचिन पिळगांवकरांबद्दल स्पष्टच बोलले गिरीश ओक, म्हणाले... 'रिकामटेकड्या लोकांचा उद्योगच ट्रोलिग...'

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, सोमय्या दाम्पत्याला दणका

SCROLL FOR NEXT