Heat
Heat Sakal
महाराष्ट्र

उष्णतेच्या लाटेत विदर्भ होरपळले; मॉन्‍सूनची वाटचाल मंदावली

सकाळ वृत्तसेवा

एकीकडे राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत, तर दुसरीकडे विदर्भात मात्र उष्णतेची लाट आली आहे.

पुणे - एकीकडे राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत, तर दुसरीकडे विदर्भात मात्र उष्णतेची लाट आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाट कायम असल्याने विदर्भ होरपळले आहे. रविवारी (ता. ५) सुद्धा उष्णतेची लाट विदर्भात कायम राहणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

राज्यात शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक कमाल तापमान गोंदिया येथे ४५.६ अंश सेल्सिअस तर नीचांकी तापमानाची नोंद महाबळेश्‍वर येथे १७.२ अंश सेल्सिअस इतकी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात पारा चाळीशीवर नोंदला गेला. तर मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान २९ ते ४१ अंशांच्या दरम्यान होते.

सध्या पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर सक्रिय असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रणालीपासून नागालॅण्डपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यात पश्चिम बंगालपासून आंध्रप्रदेशपर्यंत आणि बिहार ते आंध्रप्रदेश असा हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेची लाट अशीच कायम राहू शकते. मात्र, येत्या सोमवारपासून (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला.

मॉन्सूनचे आगमन लांबले

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सध्या गोव्याच्या उंबरठ्यावर पोचले आहे. परंतु अरबी समुद्रावरून मॉन्सूनची प्रगती मंदावली आहे. परिणामी, राज्यात मॉन्सूनच्या आगमनासाठी आणखीन काही दिवस वाट पहावी लागणार आहे. वेगाने सुरू झालेल्या मॉन्सूनच्या प्रवासाला काहीसा ‘ब्रेक’ लागला आहे. मात्र बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनने शुक्रवारी (ता. ३) संपूर्ण ईशान्य भारत व्यापला. तसे सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्याच्या काही भागात मॉन्सून दाखल झाले आहे. दरम्यान शनिवारी (ता. ४) ही स्थिती ‘जैसे थे’ आहे.

शहरात उकाडा वाढतोय

पुणे - शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचे चटके हळू-हळू वाढत आहेत. त्याचबरोबर उकाडा देखील काहीसा वाढला आहे. पुढील दोन दिवस हे चित्र असेच कायम राहणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. शहरात शनिवारी (ता. ४) ३६.७ अंश सेल्सिअस तर, लोहगाव येथे ३७. ४ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या दोन ते तीन दिवसांत शहरातील कमाल तापमानात काहीशी वाढ होताना दिसून येते आहे. त्यामुळे आता उन्हाचा ताप आणि उकाडा जाणवू लागला आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपासून (ता. ७) शहर व परिसरातील कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे व परिसरात काही ठिकाणी सायंकाळनंतर मेघगर्जनेची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT