Amit Shah,Mahadevrao Mahadik
Amit Shah,Mahadevrao Mahadik Esakal
महाराष्ट्र

शहांनी महाडीकांना दिला 'शब्द' ; विनय कोरे चर्चेच्या केंद्रस्थानी

निवास चौगले - सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) भाजपचे उमेदवार अमल महाडीक(Amal Mahadik) यांना पाठिंबा दिलेले ‘जनसुराज्य’ चे आमदार विनय कोरे (Vinay Kore)हेच महाडीक यांचा अर्ज मागे घेण्यापासून ते निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहीले. पक्षाच्या पातळीवर भाजपने माघार घेण्याचा निर्णय घेतला पण तो माजी आमदार महादेवराव महाडीक (Mahadevrao Mahadik) यांच्यापर्यंत पोहचवून त्यांना माघार घेण्यासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी विनय कोरे (Vinay Kore)यांनी पेलेली. यात प्रा. जयंत पाटील (Jayant Patil)यांनीही महत्त्वाची भुमिका बजावल्याचे पडद्यामागील घडामोडींचा अंदाज घेतल्यानंतर स्पष्ट झाले.

सहा वर्षापुर्वी झालेल्या याच निवडणुकीत कोरे यांनी आपल्या बळाचा पट पालकमंत्री पाटील यांच्या मागे लावला होता. पण विधानसभा निवडणुकीनंतर कोरे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या राजकारणात आपण भाजपसोबत राहू असे त्यांनी ‘गोकुळ’च्या निवडणुकीतही जाहीर केले होते. त्याप्रमाणे विधान परिषदेच्या यावेळच्या निवडणुकीत त्यांच्यासह इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपचे उमेदवार अमल महाडीक यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण आता ही निवडणूक बिनविरोध होण्यात कोरे यांचीही मध्यस्थी कामी आल्याचे स्पष्ट झाले.

ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना काल रात्री साडेआकरापासून वेग आला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काल दिल्लीत होते, त्यांनी पक्षाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी थेट प्रा. जयंत पाटील यांना फोनवरून संपर्क साधत ही निवडणूक बिनविरोध करावी लागेल असा पक्षाध्यक्ष असल्याचा निरोप दिला. यावर प्रा. पाटील यांनी आज पहाटे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडीक यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा विषय घातला. सुरूवातीला धनंजय महाडीक यांनी याला विरोध दर्शवला.

पालकमंत्र्यांनी मानले कोरेंचे आभार

अमल महाडीक यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे समजताच पालकमंत्री सतेज पाटील हेही जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, ऋतुराज पाटील, राजू आवळे आदि उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना ही निवडणूक बिनविरोध होण्यसाठी कोरे यांनी पुढाकार घेतल्याचे सांगत पाटील यांनी त्यांचेही आभार मानले.

दरम्यानच्या मुदतीत या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांनी बंधू डॉ. संजय डी. पाटील यांच्यासह वारणेत जाऊन कोरे यांच्याशी चर्चा केली. महाडीक यांच्याशी याबाबत चर्चा करण्याचे आवाहन पाटील बंधुंनी कोरे यांना केले. त्यानंतर कोरे यांनी महादेवराव महाडीक यांच्याशी संपर्क साधून अर्ज मागे घ्यावा लागेल असे सांगितले. त्यावर पक्ष जो निर्णय घेईल त्याच्याशी आम्ही बांधिल असून पक्षाने सांगितल्यास कोणत्याही अटीशिवाय अमल यांचा अर्ज मागे घेण्याचे आश्‍वासन महाडीक यांनी दिले.

एकीकडे या घडामोडी घडत असताना केंद्रीय मंत्री शहा यांनी थेट धनंजय महाडीक यांच्याशी फोनवरून चर्चा केली. याबाबत महादेवराव महाडीक निर्णय घेतील असे धनंजय यांनी सांगितल्यानंतर शहा यांनी थेट महादेवराव महाडीक यांच्याशीही फोनवरून चर्चा करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली. या चर्चेत भविष्यातील राजकारणाचा ‘शब्द’ही शहा यांनी महाडीक यांना दिल्याचे समजते. शहा-महादेवराव महाडीक यांच्यात चर्चा झाल्यनंतर अमल यांनी आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि ही निवडणूक बिनविरोध झाली.

एकीकडे या घडामोडी घडत असताना केंद्रीय मंत्री शहा यांनी थेट महादेवराव महाडीक यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

अमल तवंदीतून परत

निवडणूक होणारच याची खात्री असल्याने अमल महाडीक हे प्रा. जयंत पाटील यांच्यासोबत अंबाबाई दर्शनसाठी मंदीरात गेले. तेथून हे दोघे आजऱ्यातील मतदारांच्या भेटी घेण्यासाटी तवंदी घाटमार्गे आजऱ्याला चालले होते. त्यावेळी तवंदी घाटातच अमल व प्रा. पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा फोन आला. त्यामुळे तवंदी घाटातूनच अमल थेट कोल्हापुरकडे परतले. तेथून ते धनंजय महाडीक यांच्या कार्यालयात आले, तेथून प्रा. पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी आपल्यासह पत्नी सौ. शौमिका यांचा अर्ज मागे घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT