bjp  
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राच्या ‘या’ विभागात भाजपची स्पर्धा भाजपशीच

अनंत कोळमकर

नागपूर : विदर्भात 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती नसतानाही 62 पैकी 44 जागा जिंकल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर वगळता अन्य नऊ ठिकाणी भाजप-शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत पन्नासपेक्षा अधिक विधानसभा क्षेत्रांत भाजप-शिवसेनेने आघाडी घेतली. अशा अनुकूल परिस्थितीत विरोधी पक्षाचे फारसे तगडे आव्हान नसताना विदर्भात आपली शक्ती कायम राखण्यासाठी भाजपची स्वतःशीच स्पर्धा आहे.

तीन पक्षांपुढे अस्तित्वाचे आव्हान
मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि ऊर्जामंत्री ही तीन प्रमुख मंत्रिपदे असलेल्या विदर्भात गेल्या वेळची ताकद दाखविण्याचेच आव्हान भाजपसमोर असेल. मागील निवडणुकीत कॉंग्रेस दहा जागांवर घसरली, तर राष्ट्रवादीला एकाच जागेवर व शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले. विदर्भात सतत सुरू असलेली घसरण रोखण्यासाठी कॉंग्रेसला संघर्ष करावा लागणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या रूपाने विदर्भाकडे आहे. त्याचा फायदा कॉंग्रेसला होईल की नाही, हे या निवडणुकीत दिसेल. राष्ट्रवादीची जी काही थोडीफार शक्ती विदर्भात होती, ती गेल्या निवडणुकीतील मोदी लाटेत पार धुऊन निघाली. ती पुन्हा दाखवण्याची संधी या निवडणुकीत राष्ट्रवादीला आहे. तशीच शिवसेनेलाही आहे. संघटनात्मक बांधणीचा विचार केला तर भाजप सध्या मजबूत स्थितीत दिसत आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस गलितगात्र अवस्थेत आहेत. संपूर्ण विदर्भात "अपील' असेल असा नेता कॉंग्रेसकडे नाही. तशीच स्थिती राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्वप्नांवर पाणी 
प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलडाणा हे तीन जिल्हे वगळता अन्यत्र निवडून येऊ शकत नसला तरी, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याची शक्ती ते घेणाऱ्या मतांमध्ये आहे. त्यामुळे आंबेडकरांच्या या निवडणुकीतील भूमिकेबाबत उत्कंठा आहे. या निवडणुकीत विदर्भातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, भाजपचे मदन येरावार, डॉ. संजय कुटे, चैनसुख संचेती, राजे अंबरीशराव आत्राम, शिवसेनेचे संजय राठोड, कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, नितीन राऊत, नाना पटोले, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, मनोहर नाईक, राजेंद्र शिंगणे, स्वतंत्र लढणारे बच्चू कडू, रवी राणा यांचे भविष्य पणाला लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT