cm devendra fadnavis  
महाराष्ट्र बातम्या

‘पवारसाहेब तुमची मानसिकताच तसली’; मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : ‘आम्ही राज्याचे सेवक आहोत. त्यामुळेच आम्ही महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला हिशेब देण्यासाठी आलो आहोत,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

शरद पवारांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री हिशेब देण्यासाठी यात्रा काढत आहेत, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लगावला होता. त्याला आज, मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले, ‘पवारसाहेब तुम्ही हिशोब ठेवण्यासाठी तपासणीस ठेवता. तुमची मानसिकताच तशी आहे. आम्ही तसे नाही. आम्ही जनतेला जनतेत जाऊन हिशेब देतो. त्यामुळे जनतेने आम्हाला सेवा करण्यासाठी निवडून दिलं आहे. मोदीजींनी सांगितले होते की, महाराष्ट्राची जनता ही आपलं दैवत आहे. या दैवताला काँग्रेस-राष्ट्रवादी विसरली. त्यामुळे दैवताने काँग्रेस-राष्ट्रवादीला घरी बसवले.’

छत्रपतींच्या वंशजांची साथ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावर उपस्थित उदयनराजे भोसले यांचा विशेष उल्लेख केला. तसेच आता भाजपला छत्रपती शिवाजी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या आशीर्वादाबरोबरच आता छत्रपती शिवरायांच्या वंशजांची साथ मिळाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेतील भाषणात राज्यात ४ हजार किलोमीटर झालेल्या महाजनादेश यात्रेची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘राज्यात ज्या पद्धतीचा प्रतिसाद दिला. त्याचं वर्णन करता येणार नाही. राज्यातील माता भगिनींनी जे स्वागत केले. ते अविश्वसनीय आहे. महिलांच्या डोळ्यात अश्रू होते. पण, ते आनंदाचे अश्रू होते. कारण उज्ज्वला योजनेमुळे त्यांना गॅस मिळालाय. त्यामुळे त्या आनंदी आहेत. मराठवाड्यात दुष्काळी भागातील जनतेने मला पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे चेक दिले. महायात्रेत एकूण साडे तीन कोटी रुपयांचे चेक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मिळाले आहेत.’

मुख्यमंत्र्यांच्या घोषणा

  1. सर्व क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर नेणार
  2. शेतकऱ्यासाठी दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करणार
  3. कोकणाचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळणार
  4. पाच ट्रिलियनमध्ये एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी महाराष्ट्राची असेल
  5. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT