pm narendra modi  
महाराष्ट्र बातम्या

पंतप्रधान मोदींनी टोचले शिवसेनेचे कान; राम मंदिराविषयी सबुरीचा सल्ला

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : शिवसेना सातत्याने राम मंदिरचा मुद्दा उपस्थित करत आहे. गेल्या आठवड्यात पुन्हा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन, राम मंदिराबाबत शिवसेनेला सबुरीचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी नाव न घेता, शिवसेनेचे कान टोचले आहेत.

शिवसेनेचे नावच घेतले नाही
नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा शेवट झाला. यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मोदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करताना, जम्मू-काश्मीरसह पाकिस्तान आणि राम मंदिरसारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. देशात जर बहूमताचे ताकदवान सरकार असले तर, त्याचा परिणाम काय होतो, हे तुम्ही पाहिजे असेल, असे सांगून त्यांनी काश्मीर संदर्भातील कलम ३७० रद्द केल्याचा मुद्दा मांडला. त्याचबरोबर राम मंदिराच्या विषयावरही लवकरच निर्णय होणार आहे. त्यामुळे जरा सबुरीने घ्या, असा टोला शिवसेनेना नाव न घेता लगावला. विशेष म्हणजे, राज्यात शिवसेना भाजप युती एकत्र विधानसभा निवडणुकीला सामोरी जाण्याची शक्यता नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. पण, त्याचवेळी महाजनादेश यात्रेच्या समारोपात पंतप्रधान मोदींनी भाषणात शिवसेनेचे नावही घेतले नाही.

मोदींचा टोला शिवसेनेलाच
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘राम मंदिर या विषयावर काही दिवसांपासून सातत्याने भाष्य केले जात आहे. पण, हे प्रकरण न्यायालयात आहे आणि न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे. आपण सगळ्यांनी न्याय व्यवस्थेचा सन्मान करणे आवश्यक आहे. तुम्हाला मी हात जोडून विनंती करत आहे की, या देशाच्या न्याय व्यवस्थेवर आणि घटनेवर विश्वास ठेवा.’ यावेळी पंतप्रधान मोदींनी शिवसेनेचे नाव घेतलेले नाही. पण, राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेना सातत्याने भाष्य करत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा टोला हा शिवसेनेसाठीच होता, असे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT