Vidhan Sabha 2019 rate card is strong in the election Period 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : निवडणुकीच्या बाजारात 'रेट कार्ड' तेजीत; असे आहेत महिला आणि पुरुषाचे 'रेट'

प्रशांत देशपांडे

सोलापूर : निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सवच जणू. लोकशाहीच्या या उत्सवात अनेक वेळा हावसे, नवसे, गवसे असे सर्वच जण सहभागी होत असतात. उमेदवारांसाठी निवडणुकीचा काळ प्रचंड मेहनतीचा असतो तर दुसरीकडे उत्साही कार्यकर्त्यांसाठी हे चंगळ करण्याचे दिवस असताना. अनेक लोक ही यामध्ये आनंद लुटत असल्याचे चित्र आपल्याला सर्रास पहावयास मिळते. निवडणूक आयोगाने जरी खर्चाच्या मर्यादा ठरवून दिल्या असल्या तरी या काळात पैसाचा बेसुमार वापर होतो, हे उघड सत्य आहे. सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीचे रेट कार्डही असेच तेजीत आहे. 

सोलापूरात सध्या प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराकडून प्रचारासाठी पदयात्रा, आपल्या पक्षातील राष्ट्रीय नेत्यांचे आणि पक्ष प्रमुखांचे जाहीर सभा, कार्नर बैठका जोरात सुरू आहेत. पदयात्रा काढताना उमेदवारांना गल्ली बोळ फिरावे लागते. त्याच्यासाठी प्रचारात सहभागी होणाऱ्या हलग्या तसेच पुरूष आणि पुरूषांचे मानधन वधारले आहे. पदयात्रा, रॉली, जाहिर सभा अन्‌ कॉनर्र सभांना गर्दी जमविण्यासाठी प्रत्येक उमेदवारांमध्ये सध्या रस्सीखेख सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आपली इमेज तयार करण्यासाठी उमेदवरांना विविध युतकत्या आणि शक्कल लढवावी लागते. तसेच माझ्या मागे किती संख्या बळ आहे, हे दाखविण्यासाठी पदयात्रा आणि जाहिर सभांना गर्दी जमवावी लागते. त्याचबरोबर आपण निवडणुकीत उभे आहोत हे नागरिकांच्या सतत लक्ष्यात रहावे यासाठी रिक्षावरती बॅनर आणि माईक लावून ती रिक्षा विविध भागात सतत फिरवावी लागते. 

प्रत्येक पक्षाच्या उमदेवारांना आपल्या पदयात्रेत गर्दी जमविण्यासाठी गर्दी जमविणाऱ्या नेत्याला 500 रूपये आणि पदयात्रेत सहभागी होणाऱ्या पुरूषांना प्रत्येकी 400 महिलांना 300 तर युवकांना प्रत्येकी एक हजार रूपये द्यावे लागत असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर त्यांना दोन ते तीनवेळेस चहा, नाष्टा, दोन वेळचे जेवण द्यावे लागते. अनेक वेळा लोकं जमविण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था करावी लागते. तसेच दिवसभर उमदेवारांना वेगवेगळ्या ठिाकणी फिरावे लागते. एकाच ठिकाणी सतत जायाला जमत नाही. त्यासाठी त्या भागात रिक्षावरती उमेदवाराचा फोटो आणि पक्षाचे चिन्ह असलेला बॅनर त्यामध्ये माईक लावून ती रिक्षा त्या भागात दिवसभर फिरवली जाते. त्या रिक्षाद्वारे दिवसभर 20 ते 30 किलोमीटर फिरून प्रचार केला जातो. यासाठी दिवसाला 1400 ते 2000 रूपये दिले जातात. त्या व्यतिरिक्त त्याच्या जेवण, चहा, नाष्ट्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. एकूण सध्या निवडणुकीच्या बाजारात रेट कार्ड तेजीत आहे, मात्र यामुळे उमेदवार आणि पक्षांचे पदाधिकारी मात्र खर्च करून करून त्रस्त झाल्याचे चित्र आहे. 

अनेक उमेदवारांनी कर्मचाऱ्यांना लावले कामाला 
जिल्ह्याच्या विविध मतदारसंघातील अनेक उमेदवारांच्या शिक्षक, सहकारी तसेच खाजगी संस्था आहेत. या प्रत्येकाच्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या हजारांच्या घरात आहे. संबंधित उमेदवारांनी आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनाही चक्क प्रचाराच्या कार्यात जुंपले असल्याचे सांगितले जाते. नोकरीच्या भितीने अनेक वेळा कर्मचारी आपल्यावर होणाऱ्या या अन्यायाबद्दल आवाज उठवत नाहीत. मात्र, कर्मचारी प्रचारात गुंतले असल्याने काही शाळा व संस्थांचे कामकाजच बंद असल्याचे वास्तव चित्र आहे. 

निवडणुकीतील अंदाजे रेट कार्ड 
(दिवसाला प्रत्येक व्यक्तीला दिली जाणारे पैसे) 

गर्दी जमविणारा पुढारी : 500 
पुरूष : 400 
महिला : 300 
तरूण : 1000 
एक रिक्षा : 1500 
हलग्या : 500

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT