vijay shivtare on ajit Pawar after Meeting with cm shinde over baramati lok sabha seat politics marathi news  
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election : "ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल, पण आपण..."; अजित पवारांबद्दल CM शिंदे-शिवतारेंमध्ये चर्चा

Baramati Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्शभूमीवर राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे.

रोहित कणसे

Baramati Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्शभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाचं शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुक लढवण्यावरून महायुतीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंची भेट घेतली. या भेटीनंतर शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं याबद्दल माध्यमांना माहिती दिली.

शिवतारे म्हणाले की, स्वतःची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता झाली आहे, ती मोडण्यासाठी जनतेची इच्छा आहे. म्हणून मी उभं राहण गरजेचं आहे हे मी त्यांना समजावून सांगितलं. सगळी गणितं समाजवून सांगितली. यामधून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शतो. मी असंही सांगितलं की, मी जरी नसलो तरी अजित पवार निवडणून येणार नाहीत आणि ती युतीची सीट जाणारचं आहे. त्यामुळे फेरविचार करावा असेह मी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

त्यामुळे त्यांचं आपापसात काय होईल ते होईल ... ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल... पण आपण धनी नको व्हायला असं त्यांनी (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) मला सांगितलं. ही अन्यायाविरोधातील लढाई बारामती मतदारसंघातील प्रत्येकाची आहे, ही लढाई पवार विरुद्ध सामान्य जनता अशी आहे. आपण मला थांबवू नका असंही मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी पुन्हा आपल्याला ऐकावं लागेल, युतीचा धर्म पाळावा लागेल असं सांगितलं. त्यामुळे दोन-चार दिवस वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो त्यानंतर आपण ठरवू असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे विजय शिवतारे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT