shiv sena Vijay shivtare  Sakal
महाराष्ट्र बातम्या

विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी; 'सामना'तून दिली माहिती

पक्षबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर आता बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी सुरू आहे. शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोर नेत्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना नेते विजय शिवतारे यांचीही आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. (Shivsena Vijay Shivtare News)

'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच त्यांचं शिवसेना (Shivsena) सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचं वृत्त सामनातून देण्यात आलं आहे.

विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार आहे. ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचं प्रतिनिधीत्व करतात. विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई कऱण्यात आली आहे. पक्षबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी मातोश्रीवर बैठका घेण्याचा धडाकाच लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

SC-ST-OBC आरक्षणात नवा उप-कोटा? सर्वोच्च न्यायालयात केंद्राने मांडली भूमिका, आय आधारित उप-कोट्याला विरोध

School Stabbing Incident: देवगाव रंगारीत शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने हल्ला; चौघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Nashik Village Water Crisis: खाजगी जमिनीच्या वादामुळे दसाने गावाचा पाणीपुरवठा ठप्प; संतप्त महिलांचा हंडा मोर्चा, ग्रामपंचायतीला कुलूप

राज्यात ३०,२०९ शिक्षकांची भरती! जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १३,३५१, तर खासगी शाळांमधील १२,१४८ पदे; १९ हजार ८८१ शिक्षकांना मिळणार थेट नियुक्ती

SCROLL FOR NEXT