Vijay Wadettiwar esakal
महाराष्ट्र बातम्या

'महाराष्ट्राला दृष्ट लावण्याचं काम काही भोंगेबाज करताहेत'

हेमंत पवार

'जो महाराष्ट्र शांत होता, त्याला दृष्ट लावण्याचं काम काही भोंगबाज करत आहेत.'

कऱ्हाड (सातारा) : जो महाराष्ट्र शांत होता, त्याला दृष्ट लावण्याचं काम काही भोंगबाज करत आहेत. त्यांना काहीच काम नसल्यानं ते भोंगे वाजत आहेत. धर्मा-धर्मांत भांडणं लावून स्वतःची पोळी भाजण्याचं काम काही जणांकडून सुरु आहे. त्यात काही मृत्यू झाले तर टाळूवरील लोणी खाण्यासाठी काही डोम कावळे टपले आहेत. ते महाराष्ट्राला उद्ध्वस्त करु पाहत आहेत, त्यापासून ओबीसी समाजानं दूर रहावं, असा टोला मंत्री विजय वडेट्टीवर (Vijay Wadettiwar) यांनी आज येथे भाजप (BJP) आणि मनसेला (MNS) नाव न घेता लगावला.

सातारा जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या (OBC Community) मेळाव्यात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवक प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगराध्यक्षा निलम येडगे आदी उपस्थित होते. मंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका ही त्यांच्या मुखातून कोणीतरी वदवून घेत आहे, हे स्पष्ट झालंय. धार्मिक तेढ निर्माण करुन राजकारणात स्वतःला जे काय मिळवायचं आहे ते भाजप मिळवत आलं आहे. त्यातून त्यांना पक्ष मजबूत होईल, असं वाटत आहे.

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातील का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबई किंवा इतर महापालिकांच्या निवडणुकासंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते, प्रदेशाध्यक्ष जो काय निर्णय घेतील तो निर्णय अंतिम होईल. त्यानंतर आम्ही कॉंग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करु, असंही वडेट्टीवर यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT