Vijay Wadettiwar esakal
महाराष्ट्र बातम्या

Vijay Wadettiwar : ''सत्तेसाठी भाजप कारसेवकांच्या दंगली घडवेल'' वडेट्टीवारांचं स्फोटक विधान; सत्ताधाऱ्यांनी घेतला समाचार

संतोष कानडे

मुंबईः विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज एक स्फोटक विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. भाजप कारसेवकांकरवी दंगली घडवून आणेल आणि त्या माध्यमातून सत्ता हस्तगत करेल, असं विधान त्यांनी केलंय. त्यांच्या या विधानाचा सत्तापक्षातील नेत्यांनी खरपूस समाचार घेतलाय.

विजय वडेट्टीवार आज माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सत्ता मिळणार नाही असं भाजपला वाटलं की ते दंगली घडवून आणतील. रामाच्या दर्शनाला गेलेल्या कारसेवकांच्या दंगली घडवून आणण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कारसेवकांचा जीव गेला तरी भाजपला पर्वा नाही. त्या माध्यामातून ते सत्ता मिळवतील, असं वडेट्टीवार म्हणाले. धार्मिक ध्रुवीकरण करुन सत्तेत येणं हा भाजपचा इतिहास असल्याचाही आरोप त्यांनी केला.

त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, हे सरकार सतेत आल्यानंतर अनेक दंगली झाल्या. त्यापूर्वीच्या अडीच वर्षांच्या काळात एकही दंगल झालेली नव्हती. असं म्हणत आदित्यंनी सरकारवर ताशेरे ओढले.

विजय वडेट्टीवारांच्या विधानाचा समाचार घेताना गिरीश महाजन म्हणाले की, समाजामध्ये दुही पसरेल आणि दंगली होतील, असं स्टेटमेंट कुणीही करु नये. वडेट्टीवारांनी छोट्याश्या प्रसिद्धीसाठी केलेला हा भंपकपणा आहे. अयोध्येत दर्शनाला गेलेले कारसेवक दंगली पेटवतील, अशी गुप्त माहिती मिळाली असं ते म्हणत आहेत. मात्र हे चुकीचं आहे.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांच्याकडून चांगल्या कामाच्या अपेक्षा आहेत. त्यांनी काहीही बोलू नये. कदाचित त्यांना राहुल गांधांना दाखवावं लागत असेल की मी किती अग्रेसिव्ह पद्धतीने बोलतोय. परंतु त्यांनी अशी विधानं करु नयेत, असा सल्ला सामंतांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Airport Inauguration : नवी मुंबई विमानतळ उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींकडून दि.बा.पाटील यांचा विशेष उल्लेख, म्हणाले...

Mhada House: मास्टर लिस्टवरील 'त्या' ७० विजेत्यांच्या घराचा हक्क रद्द होणार; म्हाडा एकतर्फी कारवाईच्या तयारीत, कारण...

Latest Marathi News Live Update : मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा निर्णय! वर्षभरातील ३१ लाख १८ हजार रुपये वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दान

Railway Jobs 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वेतील खेळाडूंना थेट जॉब, प्रक्रिया आणि पगार एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT