Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: “मनोज जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर…”; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Sandip Kapde

Maratha Reservation: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरुन आता काँग्रेस नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विरुद्ध मनोज जरांगे असा सामना रंगला आहे. विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला थेट विरोध दर्शवला होता. दरम्यान त्यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केला आहे.

मराठा समाजला EWS मधून १० टक्के फायदा होत असेल तर तो मोठा फायदा आहे. मात्र मनोज जरांगे यांची राजकीय आरक्षणाचा फायदा घेण्याची भूमिका दिसते. जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी आग्रही नाही तर राजकीय फायद्यासाठी आग्रही आहे, असा माझा थेट आरोप असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

मराठा समाजला ओबीसींच्या ३७२ जातींमध्ये येऊन फार फायदा होणार नाही. EWS मध्ये जास्त जाती नाहीत. मराठा तरुणांनी याचा विचार करावा, जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे काही ठरवू नये. त्यांनी अभ्यास करुन भविष्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले.

विजय वडेट्टीवार म्हणाले, "सरसकट कुणबी प्रमाणपत्रामुळे मराठा तरुणांच नुकसान होणार आहे. खुल्या प्रवर्गात जास्त जाती नाहीत. जिथं नोकऱ्यांचा किंवा सवलीता संदर्भ येतो. तेथ मराठा समाजाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे मराठा नेत्यांनी मराठा तरुणांना कशात हीत आहे, काय चांगलं आहे याबाबतची भूमिका स्पष्ट करावी."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT