hasan mushrif,vinay kore esakal
महाराष्ट्र बातम्या

नुरा नाही खरी कुस्ती; कोरेंच्या टीकेला मंत्री मुश्रीफांचे उत्तर

मंत्री हसन मुश्रीफ; पराभूत जागांचे विश्‍लेषण करणार; अध्यक्षपदासाठी लवकरच बैठक

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: जिल्हा बॅंकेसाठी (KDCC Bank Elections)झालेली निवडणूकही नुरा कुस्ती नसून निवडणूकच होती. मतदारांचा कौल मान्य करायचा असतो, अशा शब्दांत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी काल(ता.८) मत व्यक्त केले. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे (Vinay Kore) यांनी केलेल्या टीकेवर त्यांनी हे मत व्यक्त केले असून तीन जागांवरील पराभवाचे विश्‍लेषणही केले जाईल. कोणत्या तालुक्यात कमी मते मिळाली याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतरच यावर बोलले जाईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

बॅंकेत सत्ताधाऱ्यांची सत्ता आली असली तरीही आमदार कोरे यांनी निवडणूक निकालानंतर नाराजी व्यक्त केली. प्रक्रिया गटातील दोघांचा विजय म्हणजे सत्तारूढ आणि विरोधी पॅनेलच्या नेत्यांता नुरा कुस्ती असल्याचा आरोप कोरे यांनी केला होता. याला मंत्री मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. जिल्‍हा बॅंकेच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीला यश मिळाल्याबद्दल त्यांनी नेते, सभासद, कार्यकर्ते यांचे आभार मानले.

गेल्या सहा वर्षांत बॅंकेने उत्तुंग प्रगती केली आहे. हेच काम पुढे चालू ठेवले जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर आमदार कोरेच्या आरोपाचे खंडण करीत ही नुरा कुस्ती नसून ती निवडणूकच होती. मतदारांचा कौल मान्य करायचा असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता तालुकानिहाय आकडेवारी मिळते. त्यामुळे कोठे किती मतदान झाले हे समजणे शक्य झाले आहे. यातून ज्या दोन जागांवर विरोधी पॅनेलचे उमेदवार विजयी झाले त्यांचे विश्‍लेषण केले जाईल. त्यानंतरच याबाबत भाष्य केले जाईल. काय झाले, कोठे झाले याचीही माहिती घेतली जाईल.

दोन जागांवर झालेला पराभव धक्कादायक असल्याचे सांगून पराभवाने नाराजी येते, दुःख होते. त्यातून आरोप होतात. काय झाले हेसुद्धा पाहिले जाईल, मात्र हे ठरवून केलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. गट दोन आणि तीन मधील विचार केला तर गतवेळीसुद्धा पतसंस्था गटातील आमचा उमेदवार पराभूत झाला होता. तसेच मार्केटिंगच्या गटातील उमेदवारांना प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. विरोधकांच्या उमेदवारांचा संपर्क अधिक होता, असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षपदासाठी कोणाचे नाव आहे, यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘विजयी आणि पराभूत असे २१ उमेदवार एकत्रित बैठक घेऊन निवडणुकीबद्दल चर्चा होईल. अध्यक्षपद ठरविण्यासाठी विजयी अठरा जणांची बैठक होईल. तीत स्वीकृतसह अन्य निर्णय सर्वांनी मिळून घेतले जातील. मी मंत्री असल्यामुळे मला मंत्रालयात वेळे द्यावा लागतो. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडून कमी करावी, अशी आशा मी यापूर्वीच व्यक्त केली होती. त्यामुळे अध्यक्षपद आणि स्वीकृत संचालक हे सर्वांच्या बैठकीतच ठरविले जाईल,’’तुम्ही अध्यक्षपद घेणार नाही काय ? या प्रश्‍नावर ते आत्ताच काही सांगता येणार नाही. सर्वांच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंडलिकांचे म्हणणे मान्य

जे मागून मिळाले नाही ते निवडून मिळविले, अशी प्रतिक्रीया खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांनी दिली आहे. यावर प्रतिक्रीया विचारल्यावर यात त्यांचे काहीच खोटे नाही. तीन जागा त्यांनी मिळविल्यात हे मान्य करावे लागेल. जनतेचा कौल मान्य करावा लागतो, असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT