MLA Vinayak Mete Accident Death
MLA Vinayak Mete Accident Death esakal
महाराष्ट्र

Vinayak Mete : मेटेंच्या निधनाबाबत धक्कादायक खुलासा; गुढ वाढलं

सकाळ डिजिटल टीम

Vinayak Mete : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे याच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या गाडीचा खरंच अपघात झाला की घातपात याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. अशातच बीड येथील शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. मेटे यांच्या गाडीचा 3 ऑगस्टलादेखील घातपाताचा प्रयत्न झाला होता. बीडहून पुण्याकडे जात असताना शिक्रापूरजवळ दोन गाड्यांनी मेटेंच्या गाडीचा पाठलाग केला होता असा खुलासा बीड येथील पदाधिकारी अण्णासाहेब माळकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर मेटेंच्या गाडीचा खरंच अपघात झाला की घातपात झाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

माळकर म्हणाले की, मेटे तीन ऑगस्टला बीडहून पुण्याला जात होते त्यावेळीदेखील शिक्रापूर जवळ दोन गाड्यांनी मेटे यांच्या गाडीचा पाठलाग केला होता. तसेच या गाडीने आमच्या गाडीला कट मारण्याचादेखील प्रयत्न केला होता. या घटनेवेळी आपण स्वतः त्यांच्यासोबत होता. आयशर गाडी आपला वारंवार पाठलाग करत असल्याचे आपण मेटेंना सांगितल्याचेही ते म्हणाले.

त्यावेळी संबंधित गाडीचा चालक नशेत असेल त्यामुळे तो वारंवार पाठलाग करत असेल असे मेटे साहेब म्हणाले होते. त्यामुळे 14 तारखेला पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातदेखील पाठलाग करणारी गाडी असेल तर, नक्कीच हा घातपातच असण्याची शक्यता असून, असे असल्यास आम्ही शांत बसणार नाही, असे माळकर यांनी स्पष्ट केले.

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर नेमकं काय घडलं?

शिवसंग्रमचे अध्यक्ष विनायक मेटे मराठा समन्वय समितीच्या बैठकीसाठी बीडहून मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी त्यांच्या कारला खालापूर टोलनाका पास केल्यानंतर अपघात झाला. यात मेटे गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर त्यांना तात्काळ पनवेल येथील एमजीएम रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले.

दरम्यान, आता बीड येथील शिवसंग्रामचे माळकर यांनी केलेल्या या धक्कादायक दाव्यानंतर या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. अपघातानंतर मेटेंच्या चालकानेही मदत मिळायला उशिर झाल्याचे म्हटले आहे.

मेटेंच्या पत्नीची चौकशीची मागणी

दरम्यान, माळकर यांच्या धक्कादायक खुलाशानंतर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संपूर्ण घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच मेटे यांच्या गाडीचा तीन ऑगस्ट रोजी पाठलाग करणाऱ्या आणि घटनेवेळच्या गाडीचा तपास करण्यात यावा अशी मागणीची मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT