politics  esakal
महाराष्ट्र बातम्या

'जे बिकाऊ होते ते गेले...' विनायक राऊतांचा बंडखोरांवर हल्लाबोल

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

धनश्री ओतारी

'जे बिकाऊ होते ते गेले त्यांची परवा करण्याची आम्हाला गरज नाही...' असे म्हणत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.(vinayak raut criticized by rebel mla maharashtra politics)

मागील १५ दिवसांच्या अनेक धक्कादायक घडामोडींनंतर राज्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सत्तांतर घडवून आणत सरकार स्थापन केलं.

यासर्व घडामोडीसंदर्भात विनायक राऊतांनी माध्यामांशी संवाद साधला. विनायक राऊत सध्या सिंधूदुर्ग रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बंडखोरांवर हल्लाबोल चढवला.

निवणूक आलेले आमदार जरी भाजपच्या दुकानामध्ये विकले गेले असले तरी जो शिवसैनिक आहे तो आज तेवढ्याच ताकदीने उद्धव ठाकरेंसोबत राहिला आहे. इतकच नव्हे तर जे जुने क्रांती मंडळी आहे ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. असे सांगात जे शिवसेनेपासून दुर गेले होते ते पुन्हा सामिल होतील असा विश्वास विनायक राऊतांनी यावेळी व्यक्त केला.

ज्यांनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही शिवसैनिक पुन्हा उभे राहिले आहोत. अशी संकट भरपुर वेळा पचवलेली आहेत. नारायण राणेंच्या बंडखोरीनंतर, आमदार वैभव नाईक यांचा आमने सामने आव्हान अशी अनेक संकट पेलेली आहेत. त्यावेळी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाऊन पुन्हा शिवसेना उभी केली.

त्यामुळे जे गेले ते गेले जे बिकाऊ होते. ते गेले त्यांची परवा करण्याची आम्हाला गरज नाही. अशा शब्दात राऊतांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला.

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ४ तारखेला शिंदे-भाजप गटाने विधीमंडळामध्ये आपले बहुमतं सिद्ध केलं. मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप झाला नसला तरी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पदभार स्विकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT