Vinod Tawde  esakal
महाराष्ट्र बातम्या

Vinod Tawde : भाजपचा उमेदवारीचा फॉर्म्युला ठरला; कुणाला मिळणार तिकीट? विनोद तावडे म्हणाले...

केंद्रात असो वा राज्यात ज्याच्याकडे जिंकण्याची क्षमता आहे, त्यालाच उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शनिवारी सांगितले.

संतोष कानडे

नागपूरः केंद्रात असो वा राज्यात ज्याच्याकडे जिंकण्याची क्षमता आहे, त्यालाच उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शनिवारी सांगितले. भाजपच्या बैठकीसाठी नागपूरला आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना तीन राज्यांच्या निवडणुकीत मोदींची गॅरंटी सर्वाधिक प्रभावी ठरल्याचे नमूद केले.

महाराष्ट्रात भाजपसोबत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे लोकसभेत आणि विधानसभेत तिकीट वाटप कसे करणार? याबाबत विचारणा केली असता तावडे यांनी सर्वांच्या पाच वर्षांच्या ट्रॅक रेकॉर्डसह निवडणूक जिंकण्याच्या क्षमतेसोबत सामाजिक, राजकीय समीकरणे तपासली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रस्थापितांनी घाबरू नये

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसविण्यात आले होते. मात्र, हे सर्व मुख्यमंत्री अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. प्रस्थापितांना घरी बसविल्या जात आहे, हा गैरसमज आहे. प्रत्येक राज्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. पंतप्रधान मोदी यांची कामगिरी, त्याला तळागाळातून मिळत असलेला प्रतिसाद बघूनच चारशेचा आकडा काढण्यात आला आहे. तीन राज्यांतील विजय हा त्याचाच एक भाग होता, असेही त्यांनी नमूद केले.

दक्षिणेवर विशेष लक्ष

देशात भाजपची सत्ता असली तरी दक्षिणेतील राज्यांत फारसे यश मिळाले नाही. हे बघून लोकसभेच्या आगामी निवडणुकीत दक्षिणेकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे तावडे यांनी सांगितले. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार आम्हाला सोडून लालूप्रसाद यांच्यासोबत गेले असले तरी मतदार आमच्या सोबतच आहे. तिथे भाजप चमत्कार घडविणार असल्याचे भाकीत तावडेंनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदी मे महिन्यात येणार सोलापुरात; विद्यापीठाने पाठविले पंतप्रधानांच्या सचिवांना पत्र; आता कोंडीपासून होणार थेट रस्ता, वाचा...

Amravati Accident : भीषण अपघात ! चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन ७० फूट दरीत कोसळले, चार जण जागीच ठार

मोठी बातमी! अधिवेशनातच होणार शेतकरी कर्जमाफीची घोषणा; थकबाकीमुळे २५ लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद, कशी असणार कर्जमाफी, वाचा...

T20 WC, IND vs SA: 'पॉवरप्लेमध्ये सामना जिंकू शकत नाही, पण...', सूर्यकुमारने द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचे काय सांगितले कारण?

Healthy Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी, सकाळी नाश्त्यात 15 मिनिटांत बनवा 'छोले सॅलड', सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT