Chief minister Eknath Shinde  Chief minister Eknath Shinde
महाराष्ट्र बातम्या

व्हिपचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल - मुख्यमंत्री

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आमच्याकडे शिवसेनेचे एकूण ४० आमदार झाले आहे. ही संख्या आणखी वाढणार आहे. यामुळे खरी शिवसेना आमची आहे. तेव्हा व्हिपचे उल्लंघन करून विरोधात मतदान करणाऱ्या आमदारांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. (Chief minister Eknath Shinde News)

दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. आज झालेल्या बहुमत चाचणीत महाविकास आघाडीला शंभरीही गाठता आली नाही. शिंदे आणि भाजप (BJP) सरकारला १६४ तर मविआला ९९ मते मिळाली. आज एक आमदार संतोष बांगर आमच्या बाजूने आले. यामुळे आमची संख्या वाढली आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आमचे सरकार करणार आहे. रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. आम्हाला राज्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. यामुळे सहकारी व विरोधी पक्षाला विश्वासात घेऊनच निर्णय घेऊ. शंभर टक्के कामे करू शकत नाही. मात्र, जितके शक्य होईल तितके काम करण्याच प्रयत्न राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. रखडलेले प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. केंद्राने आम्हाला मदतीचे आश्वासन दिले आहे. यामुळे चिंतेचे कारण नाही. राज्य आणि केंद्र एकत्र आले तर राज्याचा विकास जलदगतीने होतो, असेही मुख्यमंत्री (Eknath Shinde) म्हणाले.

आमचे सरकार उरलेले अडीच वर्षांचा कार्यकाळ शंभर टक्के पूर्ण करणार आहे. यापेक्षा जास्त काही बोलत नाही. पुढचं आताच सांगत नाही. कारण, बाकीचे जे म्हणतात तेच मुख्यमंत्री म्हणत आहे, असे म्हणालं, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

भाजप आणि शिवसेनेत मतभेद होणार नाही. आमदार संतोष बांगर आज खऱ्या शिवसेनेते आले आहे. आता आम्ही आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी जात आहे, असेही पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT