Viral Video सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

Video: ज्याच्यावर आरोप केला ‘त्या’ व्यक्तीनेच केला फडणवीसांचा सत्कार

डॉ. मुदस्सीर लाम्बे यांनी फडणवीसांचा सत्कार केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे

सकाळ डिजिटल टीम

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी एक पेनड्राईव्ह सादर केला होता. त्यावेळी त्यांनी मुस्लिम वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुदस्सीर लाम्बे यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते तर आता या प्रकरणाला नवीन वळण येण्याची शक्यता आहे कारण आरोप केलेल्या डॉ. मुदस्सीर लाम्बे यांनीच फडणवीसांचा सत्कार केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रिट्वीट करत कॉंग्रसे नेते सचिन सावंत यांनी फडणवीसांना टोला लगावलाय. (Devendra Fadnavis felicitated by dawoods man Dr. Mudassir Lambe)

सचिन सावंत यांनी डॉ. मुदस्सीर लाम्बे फडणवीसांचा सत्कार करत असल्याचा व्हिडीओ रिट्वीट केलाय आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “तथाकथित दाऊदशी संबंधित व्यक्तीकडून सत्कार.... शांतम् पापम्...शांतम् पापम्”

देवेद्र फडणीवस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी एक पेनड्राईव्ह सादर केला होता. त्यावेळी त्यांनी डॉ. मुदस्सीर लाम्बे यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते

डॉ. मुदस्सीर लाम्बे यांची नियुक्ती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीच केल्याचा आरोपही फडणवीसांनी केला होता. आताव्हायरल व्हिडिओमध्ये डॉ. मुदस्सीर लाम्बे हे फडणवीसांचा सत्कार करताना दिसत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT