Vishal Fate Get Police Custody
Vishal Fate Get Police Custody 
महाराष्ट्र

विशाल फटेला 10 दिवसांची पोलीस कोठडी!

Amit Ujagare (अमित उजागरे)

बार्शी : गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी विशाल फटे (Vishal Fate) याला बार्शीच्या सत्र न्यायालयानं १० दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. फटे गेल्या काही दिवसांपासून फरार होता. तो काल पोलिसांना शरण आला, त्यानंतर त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. जिल्हा व सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे (AjitKumar Bhasme) यांच्यासमोर सुनावणी झाली. (Vishal Fate sentenced to 10 days police custody by Barshi Sessions court)

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून मोठ्या परताव्याचं आमिष दाखवत बार्शी येथील गुंतवणूकदारांची विशाल फटे यानं फसवणूक केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. अनेक गुंतवणूकदारांनी त्याच्याविरोधात पोलिसांत फसवणुकीची तक्रारही दाखल केली आहे. या सगळा प्रकार समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून फटे हा अज्ञातवासात गेला होता. मात्र, काल त्याच्या स्वतःच्या युट्यूब चॅनेलवरुन त्यानं व्हिडिओ पोस्ट करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

व्हिडिओतून त्यानं आपल्यावरील सर्व आरोप फेटाळूनही लावले. तसेच लवकरच पोलिसांसमोर हजर होणार असल्याचंही म्हटलं होतं. त्यानुसार तो काल पोलिसांना शरण आला. त्यानंतर आज त्याला बार्शीच्या सेशन्स कोर्टात हजर करण्यात आलं. सुनावणीनंतर अधिक तपासासाठी कोर्टानं त्याला २७ जानेवारीपर्यंत दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सरकारी वकिलांनी दिली माहिती

आजच्या सुनावणीची माहिती देताना सरकारी वकिलांनी सांगितलं की, "विशाल फटे यानं लोकांना विविध आश्वासनं दिली होती. त्यानुसार सुरुवातीला त्यानं काही परतावा दिला. पण ज्यावेळी त्याला परतावा देणं अशक्य झालं, त्यानंतर तो ९ जानेवारीपासून गायब झाला होता. पण आता तो समोर आला आहे. तसंच त्यानं गुंतवणूकीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी कंपन्या स्थापन केल्याची माहिती हाती आली आहे. या कंपन्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी त्याची पोलीस कोठडी गरजेची होती. त्यानुसार, आम्ही कोर्टाकडं १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. यासंदर्भातील आमचा युक्तीवाद ऐकून कोर्टानं फटेला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT