बायको, दीड वर्षांच्या मुलीसह आत्महत्येच्या विचारात होतो - विशाल फटे

पोलिसांनी मला शोधण्याची गरज नाही, मीच त्यांच्यासमोर हजर होणार आहे.
Vishal Fate
Vishal Fate

पुणे : गुंतवणुकदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणातील प्रमुख आरोपी विशाल फटे (Vishal Fate) याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यामध्ये त्यानं आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बायको, दीड वर्षांच्या मुलीसह मी आत्महत्येचा विचार करत होतो, असंही फटे यानं यामध्ये म्हटलं आहे. (With my wife and one and half year old daughter I was contemplating suicide)

फटेनं म्हटलं की, जे मला ओळखत होते आणि जे ओळखत नव्हते अशा लोकांनी माझ्यावर वैयक्तिक चिखलफेक केली. यातून माझ्या घरच्यांची बदनामी झाली. मीडियानं कुठलीही शहानिशा न करता माझ्यावर २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. गुंतवणुकीसाठी माझ्याकडे आलेल्यांपैकी दिवसात हजारएक लोकांना मी त्यांचे पैसे गुंतवणुकीसाठी न घेताच परत पाठवलं. मला पैसे गोळा करायचेच असते तर सांगलीवाल्यानं केलं तसंच मी केलं असतं. माझ्यासाठी जमीन गहाण ठेवली असं कुणी आहे का? ज्याच्याकडे आधी सायकल नव्हती त्याच्याकडे आता टु-व्हीलर, फोर-व्हीलर आहे. लोकांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे तर मला पोलिसांनी शोधण्याची गरज नाही कारण मी स्वतःचं पोलिसांत हजर होईन. ज्या कायदेशीर बाबी आहेत त्याला सामोर जाईन. कारवाई व्हायची असेल ती होऊ दे.

बायकोसह आत्महत्या करण्याच्या विचारात होतो - फटे

माझ्यावर फसवणुकीचे आरोप व्हायला लागल्यानंतर मी बायकोसह आत्महत्या करायला चाललो होतो. मला मरणं सोपं वाटतं होतं, दीड वर्षाच्या मुलीसह माझी मरायची तयारी होती. पण मला कुठल्याही प्रकारात अडकायचं नाही, मला कुणावरही आरोप करायचा नाही. माझ्याकडून हे सर्व अपघातानं घडलंय. मी माझ्या चुका मान्य करतो, जे केलं त्याला मी जबाबदार आहे. माझ्या कंपनीत ऑन रेकॉर्ड वडिलांचं नाव आहे, पण त्यांच्यामुळे वडिलांना कसलाही फायदा झालेला नाही. मला फाशी झाली तरी त्यासाठी मी तयार आहे. मी काही गोष्टी होतात का यासाठी प्रयत्न करत होतो. पण मला हालचाल करण्यासाठी संधीच मिळाली नाही, असंही फटे यानं आपल्या व्हिडिओतून सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com