Naharparishad election

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मंगळवेढ्यातील 20 जागांसह ‘या’‌ 4 नगरपरिषदेच्या 6 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान; अनगर नगरपंचायत बिनविरोध होण्यासाठी करावे लागणार १० डिसेंबरपर्यंत वेटिंग

मंगळवेढा नगरपरिषदेच्या २० जागांसाठी आणि मोहोळ, सांगोल्यातील प्रत्येकी दोन व मैंदर्गी, पंढरपूर नगरपरिषदेतील प्रत्येकी एका जागेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २२ नोव्हेंबरनंतर ज्या नगरपरिषदांमधील अपिलांचे न्यायालयात निकाल लागले. त्यांचा निवडणूक कार्यक्रम लांबला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मंगळवेढा नगरपरिषदेच्या २० जागांसाठी आणि मोहोळ, सांगोल्यातील प्रत्येकी दोन व मैंदर्गी, पंढरपूर नगरपरिषदेतील प्रत्येकी एका जागेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २२ नोव्हेंबरनंतर ज्या नगरपरिषदांमधील अपिलांचे न्यायालयात निकाल लागले. त्यांचा निवडणूक कार्यक्रम लांबला आहे.

मंगळवेढा नगरपरिषदेसह मोहोळ, सांगोला, मैंदर्गी, पंढरपूर येथील काही जागांसाठी नवा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार त्याठिकाणी ४ ते १० डिसेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. आवश्यकतेनुसार ११ डिसेंबर रोजी चिन्ह वाटप होईल. २० डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत त्याठिकाणी मतदान पार पडेल. २१ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून निकाल जाहीर होतील. २३ डिसेंबर रोजी शासनाच्या राजपत्रात त्या नगरपरिषदांचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे.

‘या’ ठिकाणी २० डिसेंबरला मतदान

  • मंगळवेढा : पूर्ण नगरपरिषद (२० सदस्य)

  • मोहोळ : दोन जागा (प्रभाग क्र. ३ अ व ५ ब)

  • सांगोला : दोन जागा (प्रभाग क्र. १ अ व व ११ अ)

  • मैदंर्गी : एक जागा (प्रभाग क्र. ६ अ)

  • पंढरपूर : एक जागा (प्रभाग क्र. ७ ब)

अनगर नगरपंचायतीसाठी १० डिसेंबरपर्यंत वेटिंग

बार्शी नगरपरिषदेतील प्रभाग क्र. ७ याठिकाणी एकाच उमेदवाराचा अर्ज असल्याने ते बिनविरोध झाले आहेत. दुसरीकडे अनगर नगरपंचायतीत प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज राहिला आहे. त्या बिनविरोध झाल्या आहेत, पण अधिकृतपणे नगराध्यक्ष जाहीर होण्यासाठी त्यांना १० डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. तेथील सर्व प्रक्रिया बिनविरोध पार पडली. तरीपण, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ज्या उमेदवारांना अर्ज मागे घ्यायचा आहे, त्यांना ४ ते १० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Vande Bharat Cyclothon : वंदे मातरम' कोस्टल सायक्लोथॉन सायकल रॅलीतून सागरी सुरक्षेचा संदेश

T20 World Cup AUS vs IRE : संकटांवर मात करत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला; आयर्लंडने स्पर्धेतून जवळपास गाशा गुंडाळला

Latest Marathi News Live Update :दारू बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात जाणारी अवैध देशी विदेश दारू जप्त

Abhishek Sharma : हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या अभिषेकबाबत महत्त्वाची अपडेट्स; आजारी पडायला मुंबईत नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT