voting without voter
sakal
What Happens If You Don’t Have a Voter ID Card? : राज्यभरातील २९ महापालिकांसाठी उद्या(१५ जानेवारी) रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून संपूर्ण तयारी केली गेलेली आहे. शिवाय, निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडवी यासाठी प्रशासनानही सज्ज आहे. सकाळी सात वाजेनंतर मतदानास सुरूवात होणार आहे.
मतदारांना मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र सोबत आणणे गरजेचे आहे. मात्र जरी कुणी मतदार ओळखपत्र सोबत आणले नाही किंवा त्याच्याकडून विसरले असेल, तरी देखील संबंधित मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतो.
कारण, निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) सोबत १२ पर्यायी कागदपत्रे देखील मंजूर केली आहेत. महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी सांगितले आहे की, मतदार ओळखपत्र नसल्यास, मतदार इतर कागदपत्रे सादर करू शकतात. यामध्ये पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, केंद्र/राज्य सरकारांनी दिलेले फोटो ओळखपत्र आणि फोटो असलेले बँक/पोस्ट ऑफिस पासबुक यांचा समावेश आहे.
याशिवाय, अपंगत्व प्रमाणपत्र (फोटोसह), मनरेगा जॉब कार्ड, पेन्शनशी संबंधित फोटो असलेले कागदपत्रे, खासदार/आमदारांचे अधिकृत ओळखपत्र, स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र आणि केंद्रीय कामगार मंत्रालयाने दिलेले फोटो असलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड देखील मान्य केले जाणार आहेत.
याशिवाय, निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाच्या दिवशी पाळल्या जाणाऱ्या निर्बंधांची यादी जाहीर केली आहे. मतदान केंद्रांमध्ये मोबाईल फोन वापरण्यास परवानगी नाही. अपरिहार्य परिस्थितीत ते बंद करावे लागतील. मतदारांना काडेपेटी किंवा ज्वलनशील घटक किंवा खिशातील चाकू यासारख्या तीक्ष्ण वस्तू सोबत बाळगण्यास देखील मनाई असणार आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अफवा पसरवू नका किंवा त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन नागरिकांना केले गेले आहे.