Wardha Abortion Case डॉ. निरज कदम, डॉ. रेखा कदम
महाराष्ट्र बातम्या

Wardha Abortion Case: तपास अधिकारीही पडले बुचकाळ्यात

आरोग्य विभागाच्या पथकाने या रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत तपास केला

रूपेश खैरी

वर्धा : आर्वीच्या अवैध गर्भपात प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाच्या पथकाने रुग्णालयाची तपासणी केली. ही तपासणी करताना गर्भपाताच्या नोंदी (Wardha Abortion Case) दर तीन महिन्यांनी शासनाला पाठवायाच्या असताता. पाठविलेल्या नोंदी आणि येथील नोंदवही तंतोतंत जुळत (Annual entries matched) असल्याचे पाहून तपास अधिकारीही बुचकाळ्यात पडले आहेत.

तपास पथकाने रुग्णालयात तब्बल १५ तास घालवले. यात त्यांनी अनेक कागदपत्र जप्त केले. शिवाय शासकीय व अन्य औषधसाठा असलेली तब्बल १० कपाटे सील केली. रुग्णालयात कालबाह्य औषधसाठा आढळून आला आहे. त्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या यापूर्वीच दिल्याचे चौकशी पथकाकडून सांगण्यात आले.

कालबाह्य झालेल्या माला डीएन गोळ्या आणि ऑक्सिटोसिन इंजेक्शन या पथकाने जप्त केल्याची माहिती आर्वी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी दिली. या तपासणीचा कच्चा अहवाल त्यांनी तयार केला असून तो लवकरच जिल्हा समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. त्यांच्याकडून सूचना मिळाल्यानंतरच या प्रकरणातील कारवाईची पुढील दिशा ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

शासनाचे विशेष पथकाचे संकेत

प्रकरणाचा अहवाल पीसीपीएनडीटीच्या अशासकीच सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी आर्वीला भेट दिल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सादर केला. या प्रकरणात कोणत्याही दोषीला माफी मिळणार नाही याची काळजी घेण्यासाठी राज्य स्तरावर समिती गठणाचे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय या प्रकरणाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पतीच्या सांगण्यावरून काम

अवैध गर्भपात प्रकरणात (Wardha Abortion Case) अटकेत असलेल्या डॉ. रेखा कदम यांनी आपण हे काम पतीच्या सांगण्यावरून करीत असल्याचे सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. यानंतरच पोलिसांकडून डॉ. नीरज कदम यांना अटक केली.

आरोग्य विभागाच्या पथकाने या रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत तपास केला. येथे असलेले रेकॉर्ड आणि शासनदरबारी असलेल्या नोंदींशी जुळत आहेत. असे असले तरी अन्य त्रुटींबाबतचा अहवाल जिल्हा समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाईची दिशा ठरेल.
- संगिता भिसे, प्रभारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

Parbhani Elections : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे भाजपाला बहुमत हुकलं, मेघना बोर्डीकर यांचे प्रयत्न अपूर्ण

Dilip Walse Patil : मला काही झाले नाही; मी भक्कम आहे, पण अजितदादांच्या जाण्यामुळे; माजी गृहमंत्री दिलीपवळसे पाटील यांच्या भावना अनावर

SCROLL FOR NEXT