महाराष्ट्र बातम्या

Washim Mass Copying Case : वाशिममधील सामूहिक कॉपी प्रकरणात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून २७ जणांवर गुन्हे दाखल!

Washim Copy Case: 26 शिक्षक व एका शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर वाशीम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Washim Cheating Incident: वाशीममधील बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान केंद्र क्रमांक ०९०६, श्री मैनागीरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय, टो-जुमडाफाटा येथे सामुदायिक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून 26 शिक्षक व एका शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर वाशीम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

श्री मैनागीरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय, जुमडा फाटा, टो येथे बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपर सुरु असताना भरारी पथकाच्या अचानक धाडीत तब्बल ५८१ विद्यार्थ्यांनी शब्दशः एकसारखी उत्तरे लिहिल्याचे स्पष्ट झाले होते.

प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात १६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता केंद्रावर अचानक पाहणी केली असता, केंद्रावरील गंभीर अनियमितता उघड झाल्या होत्या. या प्रकरणात शिक्षण विभागाने गंभीर दखल घेत गट शिक्षणाधिकारी गजानन बाजड यांनी 17 रोजी रात्री वाशीम ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याविरुद्ध रात्री उशिरा तक्रार दिली.

या तक्रारीवरून वाशीम ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी स्थळ पंचनाम्याची कारवाई सुरु केल्याची माहिती वाशीम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ठाणेदार श्रीदेवी पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुस्तकांच्या दुकानातून ₹३,००० कोटींचे साम्राज्य! गलगोटियास विद्यापीठाची स्थापना कुणी आणि कशी केली? वाचा सुनील गलगोटियांची कहाणी

Mumbai News: अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेशी तडजोड नाही, आयएनएस शिक्राजवळील इमारतीचे काम थांबविण्याचे आदेश

T20 WC Super 8s Full Schedule : पाकिस्तानच्या विजयासह 'सुपर ८' संघ ठरले; जाणून घ्या टीम इंडियासह सर्व संघांचे वेळापत्रक

Navi Mumbai: क्षुल्लक कारण पण अमानुष शिक्षा! हातावर व्रण येईपर्यंत ४० फटके अन्...; टीचरचं विद्यार्थिनीसोबत विकृत कृत्य, काय घडलं?

Holi Horoscope Predictions: होळीनंतर मेषसह 'या' दोन राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल; गुरु मार्गी होताच सुख-समृद्धीचे नवे योग

SCROLL FOR NEXT