Anita Kothadiya 
महाराष्ट्र बातम्या

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Baramati Lok Sabha: निवडणुकीसाठी झालेल्या पहिल्या तिन्ही टप्प्यांमध्ये मतदान कराण्यासाठी लोकांमध्ये अनुत्सुकता दिसत आहे. तसेच गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारीही घसरल्याचे पहायला मिळत आहे.

आशुतोष मसगौंडे

सध्या देशभरात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यांमध्ये होणार असून, यातील तिसरा टप्पा काल, मंगळवारी पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील 11 जागांचा समावेश होता.

निवडणुकीसाठी झालेल्या पहिल्या तिन्ही टप्प्यांमध्ये मतदान कराण्यासाठी लोकांमध्ये अनुत्सुकता दिसत आहे. तसेच गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारीही घसरल्याचे पहायला मिळत आहे.

एकिकडे निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करत असताना बारामती लोकसभा मतदारसंघातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

येथे एका 83 वर्षीय आजींनी मतदान करण्यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्नियातून थेट बारामती गाठात आपला मतदानाचा हक्क बजावला.

लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान पार पडले. या 11 जागांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचीह समावेश होता. येथे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील लढतीमुळे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

अत्यंत चुरशीच्या होत असलेल्या या निवडणुकीत मतदान करण्यासाठी अनिता कोठाडिया या 83 वर्षांच्या आजी अमेरिकेतील कॅलिफोर्नियातून बारामतीला आल्या होत्या.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अनिता कोठाडिया म्हणाल्या, "मी खास मतदान करण्यासाठी अमेरिकेतून बारामतीला आली आहे. मी आतापर्यंत एकही निवडणूक चुकवली नाही, प्रत्येक वेळी मतदान करुन माझी जबाबदारी पार पडली आहे."

यावेळी अनिता कोठाडिया यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या,"तुम्ही घरात बसू नका जरा आजूबाजूल पाहा आणि मतदान करून सहकार्य करा. घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही. त्यामुळे तुम्ही बाहेर पडा आणि मतदान करा."

दरम्यान, बारामतीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे मैदानात आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रावादीने सुनेत्रा पवार यांना संधी दिली आहे.

राष्ट्रवारी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच बारमतीमध्ये मोठी निवडणूक होत आहे. त्यामुळे येथे कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT