Vilholi Water Purification Centre esakal
महाराष्ट्र बातम्या

Water Purification Plant: भांडूप संकुल येथे जलशुद्धीकरण प्रकल्प; दोन हजार दशलक्ष लीटर पाणी होणार शुद्ध

वाहतूक व्यवस्थेत आमुलाग्र क्रांती घडवून आणणारा आणि मुंबईकरांच्या जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम करणारा मुंबई किनारी रस्ता या वर्षात कार्यान्वित होईल असे स्पष्ट करून अतिरिक्त आयुक्त भिडे म्हणाल्या की, उत्तर मुंबईपर्यंत वाहतूक वेगवान व्हावी म्हणून वर्सोवा ते दहिसर किनारी रस्ता आणि त्यापुढे दहिसर ते मिरा-भाइंदर उन्नत मार्ग, गोरेगाव-मुलूंड हे प्रकल्प देखील पालिकेकडून नियोजित आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Water Purification Plant: स्वस्त व शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई महापालिकेने भांडुप संकूल येथे दोन हजार दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याबाबत नियोजन केल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा प्रशासक ( प्रभारी) अश्विनी भिडे यांनी दिली.

आधुनिकीकरण व अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग पालिकेने अवलंबला आहे.मुंबईकरांचे जीवनमान सुखकर, सुसह्य करण्यासाठी पालिकेकडून होत असलेले प्रयत्न कायम राहतील असे स्पष्ट अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट प्रजासत्ताक दिनानिमित्त पालिकेने केलेल्या लोकाभिमूख उपक्रमांची माहिती दिली.

स्वस्त व शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई महापालिकेने भांडुप संकूल येथे दोन हजार दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प पालिकेतर्फे उभारण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईचे पालकत्व सांभाळताना पायाभूत सुविधा विकासासाठी महानगरपालिकेने काळानुरुप अत्याधुनिक, भव्य प्रकल्प हाती घेतले आहेत. नागरी सेवा-सुविधांमध्ये पालिकेच्या या प्रयत्नांमध्ये एक नागरिक या नात्याने समस्त मुंबईकरांचा यापुढेही लोकसहभाग मिळावा, सहकार्य मिळावे, जेणेकरुन प्रजासत्ताक संकल्पनेला पूर्ण अर्थ प्राप्त होईल, अशी भावना आश्विनी भिडे यांनी यावेळी व्यक्त केली.

वाहतूक व्यवस्थेत आमुलाग्र क्रांती घडवून आणणारा आणि मुंबईकरांच्या जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम करणारा मुंबई किनारी रस्ता या वर्षात कार्यान्वित होईल असे स्पष्ट करून अतिरिक्त आयुक्त भिडे म्हणाल्या की, उत्तर मुंबईपर्यंत वाहतूक वेगवान व्हावी म्हणून वर्सोवा ते दहिसर किनारी रस्ता आणि त्यापुढे दहिसर ते मिरा-भाइंदर उन्नत मार्ग, गोरेगाव-मुलूंड हे प्रकल्प देखील पालिकेकडून नियोजित आहेत.

मुंबईतील सर्व रस्ते खड्डे मुक्तीसाठी पालिकेने रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण व्यापक स्तरावर सुरु केले आहे. वेगवेगळ्या पुलांची कामे प्रगतीपथावर आहे. भविष्याचा विचार करता, पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी व पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न सुरु केले आहेत. पालिकेने सुरू केलेली 'सखोल स्वच्छता मोहीम' अर्थात डीप क्लीन ड्राइव्ह लोकसहभागातून एक चळवळ बनली आहे. घनकचरा व्यवस्थापनात लोकसहभागाच्या उद्देशाने स्वच्छता दूत नेमण्यात येत आहेत.

ईटी गव्हर्मेंट डिजीटेक अवऑ़र्डने पालिकेचा

स्वच्छतेच्या तक्रारींचे जलद, परिणामकारक निवारण करण्यासाठी सुरू केलेल्या ''मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई'' या हेल्पलाईनद्वारे आतापर्यंत १० हजारांहून अधिक तक्रारींचा विक्रमी वेळेत निपटारा करण्यात आला असून या कामगिरीसाठी 'ईटी गव्हर्मेंट डिजीटेक अवॉर्डस' स्पर्धेमध्ये पालिकेला सुवर्णपदक प्राप्त झाले, ही महानगरपालिकेसाठी गौरवाची बाब असल्याचे भिडे यांनी नमूद केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT