udhav thakare  Sakal
महाराष्ट्र बातम्या

इंधन परिषदेत उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला म्हणाले...

महाराष्ट्र नेहमीच पुढे मार्गक्रमण करणारे राज्य असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आम्ही केवळ महाराष्ट्राचा (Maharashtra) नव्हे, तर देशाचा विचार करतो, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्र नेहमीच पुढे मार्गक्रमण करणारे राज्य असून, जे काही करायची आवश्यकता आहे ते तर राज्य करत आले आहे, आणि यापुढेही करत राहिल. आज अनेक विषयांवर चर्चा होत असून, पर्यायी इंधनावर चर्चा केली जात आहे ही खरोखरीच महत्त्वाची बाब असल्याचे म्हणत त्यांनी मोदींच्या 'चाय पे चर्चा' वर नाव न घेता टोला लगावला आहे. पेट्रोल डिझेलच्या शोधानंतर शंभर दीडशे वर्षानंतर त्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधणे हे काही सोपे काम नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं चांगली कामं गेल्या दोन दिवसात सुरु झाली आहेतआज आपलं लक्ष गेल्यानं धूर टाकण्याऱ्या गाड्या बंद झाल्या असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. ते पर्यायी इंधन परिषदेत बोलत होते. (CM Uddhav Thackeray On Alternate Fuel Conference)

आम्ही केवळ राज्याच्या विचार करत नाही तर, संपूर्ण देशाचा विचार करतो असे देखील ते म्हणाले. मार्गदर्शन करणे हा राजकारण्यांचा आवडता छंद असून, माहिती असो किंवा नसो पण काहीतरी बोलायला पाहिजे. मात्र, येथे सर्वच तज्ज्ञ असल्याने मी काही विशेष बोलण्याचे धाडस करणार नाही. गेल्या दोन वर्षांच्या पॉज बटनानंतर आपण प्ले बटनावर आलो आहोत. या काळात आपण प्रत्येक जण जैसे थे परिस्थिती होती. आपण नेहमी म्हणतो विकासाला गती पाहिजे, पण ही गती प्रगतीची आहे का अधोगतीची आहे ही थोडसं थांबून विचार करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (Fuel Conference)

गेल्या दोन वर्षांच्या पॉज बटनानंतर आपण प्ले बटनावर आलो आहोत. या काळात आपण प्रत्येक जण जैसे थे परिस्थिती होती. मात्र, आता जवळपास राज्य निर्बंधमुक्त झाले असून, पुढे जाण्यासाठी आवश्यक ते सर्व पावले उचलण्याची वेळ आली आहे. जसा कोरोना हा एक व्हायरस आहे तसाच प्रदुषण (Air Pollution) हादेखील एक व्हायरस असल्याचे ते म्हणाले. मात्र, हा व्हायरस दिसत नाही. याचे अनेक परिणाम श्वासाशी संबंधित रूग्णांना भोगावे लागत आहेत. त्यासाठी पर्यायी योजना आवश्यक असल्याचे सांगत पर्यावरण जपलं पाहिजे असे ते म्हणाले. यासाठी शाश्वत विकासाची गरज असल्याचे ते म्हणाले.

आपण नेहमी म्हणतो विकासाला गती पाहिजे, पण ही गती प्रगतीची आहे का अधोगतीची आहे ही थोडसं थांबून विचार करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी पर्यावरणाची हान होऊ न देता विकास व्हायला व्हावा असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या जनतेला आरोग्यदायी जीवन कसं प्राप्त करु शकतो याबाबत विचार करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT